अकोला : स्व. दादारावजी लोड पाटील यांना समाजसेवेची मोठी आवड होती. त्यांच्या समाजसेवेची आठवण आजही पंचक्रोशीतील लोक काढतात. त्यांच्या समाजसेवेचा वसा त्यांचे चिरंजीव संदीपदादा पाटील यांनी विविध समाजकार्यांमधून तसेच डॉ. सुरज पाटील यांनी रुग्ण सेवेतून कायम ठेवला आहे. असे प्रतिपादन हभप गोपाल महाराज उरळकर यांनी केले. स्व. दादारावजी लोड पाटील यांच्या 29 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून संदीपदादा पाटील व डॉ. सुरज पाटील यांनी सुदृढ व निरोगी समाजासाठी अत्यंत चांगला उपक्रम राबविलेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुलभाताई दादारावजी लोड पाटील ह्या होत्या. तसेच या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला आयकॉन हॉस्पिटल चे सीईओ डॉ. राम शिंदे, डॉ. अभयदादा पाटील, डॉ. रेखाताई पाटील, डॉ. प्रशांत वानखडे, न्यू ग्लोबल हॉस्पिटल अकोला, डॉ. निलेश दायमा, डॉ. संजय सरोदे, शासकीय रुग्णालयाचे तज्ञ डॉ. ज्योती गवई, डॉ. अस्मिता अकर्ते, डॉ. सतीश उकरडे, डॉ. संतोष शिरसाठ, डॉ. रुपेश तायडे यांच्यासह ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. नवीन तिरूख, डाॅ. रविकिरण फाळके, डॉ. रवी खंडारे, पारस येथील डॉक्टर मंडळी डॉ. संजय चांडक, डॉ. प्रवीण भाकरे, डॉ. विजय तिजारे आदी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.
बाळापूर तालुक्यातील पारस येथे पार पडलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तालुक्यातील शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला. तज्ञ डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये अनेक युवकांनी रक्तदान सुद्धा केले. या शिबिराचा लाभ घेणाऱ्या शेकडो रुग्णांसह शिबिराला उपस्थित झालेल्या तालुक्यातील हजारो नागरिकांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
अधिक वाचा : महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड लढविणार जवळपास १०० जागा,प्रदेश संघटक कपिल ढोक यांची माहिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola