अकोट(प्रतिनिधी)- अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने अकोट विभागात अवैध धंदे वाल्यावर कारवाईचा धुमधडाका लावला असून आज सावरायेथील दारूचा अड्डा उध्वस्त करून मुद्देमालसह आरोपीला अटक करण्यात आलि आहे.
आज दुपारी गुप्त माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांचे पथकाने सावरायेथे जाऊन रेड केली असत्ता देशी दारू 999 कंपनीचे 21 नग किंमत 1092 रुपये व आय बी कंपनीचे 07 नग किंमत 1200 रुपये असा एकूण 2292 रुपये चा मुद्देमाल सह आरोपी नामे मोहन मधुकर सपकाळ वय 28 वर्ष , रा सावरा ता अकोट जि अकोला हा अवैध दारू बाळगत असताना मिळून आला आहे, सदर आरोपी याचे विरुद्ध पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे सदर कारवाई मा sdpo सुनील सोनवणे सा यांचे मार्गदर्शन खाली राजू खरचे, ना पो का राजेश्वर सोनवणे ,सुभाष वाघ ,अनिल लापूरकर हर्षद देशमुख यांनी केली