अकोला(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या , राज्या सह देशात 8500 सभासद असलेल्या , 354 तालुका पत्रकार संघ , 35 जिल्हा पत्रकार संघ संलग्न असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई ने आपली कक्षा रुंदावत राज्यात सोशल मीडिया सेल ची स्थापना केली असून सोशल मीडिया सेल च्या विभागीय निमंत्रक पदी एबीपी माझा चे स्टार रिपोर्टर व अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य उमेश अलोने यांची नियुक्ती केली आहे.
सोशल मीडिया सेल च्या जिल्हा निमंत्रक पदी महा व्हॉइस न्यूज पोर्टल चे अभ्यासू पत्रकार गजानन गवई यांची तर जिल्हा समन्वयक पदी तेल्हारा चे अवर अकोला न्यूज पोर्टल चे पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य निलेश जवकार यांची नियुक्ती केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी जि बीड येथे काल संपन्न झालेल्या पत्रकारांच्या मेळाव्यात परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख , महाराष्ट्र सोशल मीडिया सेल चे निमंत्रक बापूसाहेब गोरे , राज्य समन्वयक अनिल वाघमारे , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मिरसाहेब यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यासाठी या तिघांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली , या मेळाव्यात उपस्थित निलेश जवकार यांना परिषदेचे नेते एस एम देशमुख , परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , निमंत्रक बापूसाहेब गोरे , अरुण वाघमारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले , उमेश अलोने व गजानन गवई या मेळाव्यात उपस्थित राहू न शकल्या मुळे त्यांना लवकरच होणाऱ्या सोशल मीडिया सेल च्या मिटिंग मध्ये त्यांची नियुक्ती पत्र देण्यात येतील असे परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले