पातूर (सुनील गाडगे)- पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या पातूर-अकोला मार्गावरील नांदखेड फाट्याजवळ दोन मोटारसायकल स्वारांनी एका टँकरचे समोर मोटारसायकल आडवी करुन टँकरला रोकले व टँकर चालका जवळुन नगदीसह १८,३०० रुपयांचा माल लूटुन नेल्याची घटना शुक्रवारी रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान झाल्याची घटना झाली आहे.
या घटनेची तक्रार पातूर पोलीसात टँकर क्र. एम. एच. ३७ ए. ०५५१ चा चालक शेख नासीर शेख जफर रा. पोळा चौक, अकोला यांनी दिली आहे. या तक्रारीमध्ये शेख नासीर हे पातूर-अकोला मार्गावरुन जात असतांना नांदखेड फाट्याजवळ अज्ञात दोन मोटारसायकल स्वारांनी त्याच्या टँकर समोर मोटारसायकल आडवी करुन टँकरला रोखले. व ट्रैक च्या कैबीनमध्ये दोघे चढुन शेख नासीरवर हल्ला केला. त्यामध्ये नासीर जखमी झाला आहे. ट्रैक चालक नासीर जवळुन ३३०० रुपए नगद आणि १५००० रु. किमतीचे मोबाइल हिसकले. आणि पातूरकडे फरार झाले.
भयभीत झालेल्या ट्रैक चालकाने तात्काळ पोलीस स्टेशन गाढुन तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अज्ञात चार लूटमारी करणार्या विरोधात कलम ३९४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी पातूर ठाणेदार गजानन गुल्हाने करित आहेत.