तेल्हारा (प्रतिनिधी) : दि ५ शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवसेना शहिदांना अभिवादन करण्यात आले. ५ जून १९८८ साली अकोट मतदार संघातील पंचगव्हाण येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटना प्रसंगी उसळलेल्या दंगलीत पाथर्डी येथील शिवसैनिक आया बहिणी, लहान मूल, व शाखेच्या उद्घाटनाला आलेल्या शेकडो शिवसैनिकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या त्याकाळचे शिवसेना शाखा प्रमुख स्व. अवचितराव कुकडे, स्व. श्रीराम गावंडे, स्व. दिगंबरराव कुकडे, व नेर धामना येथील शिवसैनिक स्व. भांबेरे या वीरांनी आपले प्राण गमावले शिवसेनेसाठी शहिद झाले.
या शहिदांना शिवसेना शहीद स्थळ पाथर्डी तालुका तेल्हारा येथे सर्व शिवसैनिक, युवासैनिक, व गावकऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
अधिक वाचा : बाळापूर शहरात हिंदुसूर्य शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४७९ वी जयंती मोठया उत्सवात साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola