बाळापूर(शाम बहुरूपे)– बाळापूर शहरात राजपूत समाजाच्यावतीने हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांची ४७९ वी जयंती फटाक्याच्या आतिष बाजीत मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या फलकाचे पूजन करून रक्तदानाश सुरवात करण्यात आली व सायंकाळी 7 वाजता बाळापूर येथील मेन चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी ८२ युवकांनी रक्तदान केले. राधेलालसिंह ठाकूर,करणसिंह ठाकूर,ब्रिजमोहन मन्द्रेले, इंद्रजितभैय्या ठाकूर,नगरसेवक प्रितेश गुजराथी,बाळापूर चे ठाणेदार गजानन शेळके,भूषण गुजराथी, शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख, छत्रपती सेना अध्यक्ष करण शाहू,नितीन मानकर,उमेशआप्पा भुसारी, शिवपालसिंह ठाकूर,धरमसिंह ठाकूर हरिओमसिंह ठाकूर,संजयसिंह ठाकूर, रमेश लोहकरे,गणेश धोपटे, व गावातील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गावातील पंचक्रोशीतील व पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य केल्याबद्दल राजपूत समाज व महाराणा प्रताप नवयुवक दलाच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार मानले.
अधिक वाचा : तंटामुक्त मूल्यमापन समितीवर रामभाऊ फाटकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola