अकोला(प्रतिनिधी)– अकोला रेल्वे स्थानका वर रेल्वे फलाट क्रमांक ५ वर एका अज्ञात इसमाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली. मृत इसमाची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करुन मारेकर्याला अटक केला आहे. आरोपी मनोरुनग असून त्याने हा खून का केला या बाबाबत तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
रात्रीच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानका वरील प्लँटफॉर्म नंबर ५ वर एका ३५ वर्षीय इसमाची अज्ञात व्यक्तींनी भारी भरकम शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन वर घडली. सदर घटना आज (ता.७ जून) च्या सकाळी उघडकीस आली असून मृतकाचे नाव अध्याप पर्यंत समजू शकले नाही. रात्रौच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मृतकताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. सदर घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. पोलीस हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी गाठून मृतदेहाचा पंचनामा करीत आहेत.
अधिक वाचा : अकोट ब्रेकिंग- चारचाकीत बसला आणि गुदमरून मृत्यु झाला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola