गाडेगाव (प्रतिनिधी) : दि.५ जुन पर्यावरण दिनी वान फाऊंडेशनच्या वतीने एका कासवाला वारी हनुमान येथील धरणात सोडून जीवदान देण्यात आले.
गाडेगाव ता.तेल्हारा येथे काही दिवसापुर्वी रामचंद्र इंगळे यांच्या घरासमोर रात्री एक कासव आढळून आला होता.रामचंद्र इंगळे हे स्वतः पर्यावरण प्रेमी असल्यामुळे त्यांनी तो कासव वनविभागाकडे सुपुर्द करण्याचे ठरवले व त्यांनी वनविभागाला संपर्क केला असता वनविभागाने कासव लवकरच घेऊन जाण्याची तयारी दर्शवली होती परंतु बरेच दिवसानंतरही काही हालचाली नाही झाल्याने गावातीलच निसर्ग प्रेमींनी पुढाकार घेऊन त्या कासवाला धरणात सोडण्याचा निर्णय घेतला.
या करीता वान फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तमभाऊ नळकांडे निसर्गमित्र परमेश्वर इंगळे, शुभम वडतकार, अक्षय सोनोने, आयुष नळकांडे यांनी पर्यावरण दिनी त्या कासवाला वारी भैरवगड येथे जाऊन वान धरणात सोडुन दिले. निसर्ग प्रेमींच्या या कार्याबद्दल गावात कौतुक होत आहे.
अधिक वाचा : स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त भव्यरक्तदान शिबीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola