नवी दिल्ली :केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने २०२० सालच्या परीक्षेचे वेळापत्रक आयोगाच्या वेबसाईटवर जाहरी केले आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा २०२० मध्ये ३१ मे रोजी होणार आहे. यूपीएससीने upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक दिले आहे.
नागरी सेवा परीक्षेसाठी नोंदणी प्रकिया ही १२ फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रकिया ३ मार्च, २०२० पर्यंत सुरु असणार आहे. तर नागरी सेवा मुख्य परीक्षा ही १८ सप्टेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS)ची पूर्व परीक्षा ही ३१ मे, २०२० रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयएफएसची नोंदणी प्रकिया १२ फेब्रुवारी, २०२० मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रियादेखील ३ मार्च, २०२० पर्यंत सुरू असणार आहे. आयएफएसची मुख्य परीक्षा ही २२ नोव्हेंबर २०२० मध्ये होणार आहे.
यूपीएससीने संरक्षण सेवा परीक्षांचीदेखील घोषणा असून त्यामध्ये कमबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) २०१९ चे नोटीफिकेशन ३० ऑक्टोबर, २०१९ ला जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी १९ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
सीडीएसची पहिली परीक्षा २ फेब्रुवारी, २०२० मध्ये होणार आहे. तर सीडीएस (२) ची परीक्षा ही ८ नोव्हेंबर २०२० मध्ये होणार आहे. सीडीएस (२) परीक्षेसाठी नोंदणी ५ ऑगस्ट २०२० पासून २५ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.
सीडीएसशिवाय केंद्रीय सशस्त्र दलातील असिस्टेंड कमांडंटची परीक्षा ९ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.
अधिक वाचा : बाळापूरातील ऐतिहासिक परकोट झाले कचरा मुक्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola