हिवरखेड(दिपक रेळेवारखेड) : हिवरखेड-अकोट आणि हिवरखेड तेल्हारा आडसुल या दोन्ही राज्य मार्गांची पुरती वाट लागली आहे. त्यातल्या त्यात हिवरखेड-आकोट मार्गाचे नियोजन शून्य आणि निकृष्ट काम सुरू असल्याने खाजगी वाहन सह एसटी महामंडळाच्या बसेस भंगार पेक्षाही खराब स्थितीत पोहोचल्या आहेत. भंगार रस्ते आणि भंगार गाड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
30 मे गुरुवार रोजी अकोटहुन हिवरखेड मार्गे तेल्हारा जाणारी तेल्हारा आगराची बस क्र. एम एच 40 एन 9514 हि बस हिवरखेड नजीक संकट मोचन मंदिर जवळ पोहोचली असता खराब रस्त्यांमुळे ह्या बस चे टायर फुटल्याने जोरदार धमाक्याचा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. टायर फुटल्याने धमाक्याचा आवाज ऐकून शेजारी शेतकरी सुद्धा घटनास्थळावर धावून आले. टायर फुटण्याच्या पाठोपाठ बसचे आणखी दोन टायर जागीच पंक्चर झाले एकाच बाजूचे तीनही टायर निकामी झाल्याने पंधरा प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. परंतु चालक गौरव प्रकाश पंड यांनी प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविले त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. नंतर वाहक ए एम धांडे नी दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून दिली. चालकाने 3 टायर निकामी झाल्याबाबत सूचना दिल्यानंतर त्या मार्गे येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये 3 टायर पाठविण्यात आली. टायर घेऊन येणारी बस सुद्धा संपूर्ण भंगार अवस्थेत असल्याने तेल्हारा आगारातील जवळपास सर्वच बसेस भंगार झाले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचवेळी हिवरखेड येथील टी पॉईंट नजीक जळगाव नागपुर एम एच 40 वाय 5862 ही लांब पल्ल्याची बस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे नागपूरला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. भंगार रस्ते आणि भंगार बसेसच्या अवस्था पाहून कोठे नेऊन ठेवला रे महाराष्ट्र माझा??? असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते.
प्रतिक्रिया
रस्त्यांच्या प्रचंड दुरावस्थेमुळे एस टी बसेस भंगार झाल्या आहेत, टायर सुद्धा लवकरच निकामी होत आहेत. रस्त्यांमुळे आमचा नाईलाज आहे.
संतोष वानरे, आगार व्यवस्थापक तेल्हारा
अधिक वाचा : अकोला जिल्हयातील निकृष्ट रस्त्यांच्या बाबत प्रहार आक्रमक,अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार काळे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola