रंभापुर ते हिवरखेड ते वारखेडकिलोमीटर ४०
प्रती किलोमीटर एक ते दिड कोटी खर्च
रस्त्याची किंमत ५१कोटी रुपये
आमदार+ठेकेदार+अधिकारी=५१कोटी
सबका साथ सबका विकास
आकोट अकोला रस्त्याचे पण तसेच त्यामध्ये पण सबका साथ सबका विकास आकोट ते अकोला एका किलोमीटर मागे ६ कोटी रुपये खर्च आहे. ४५ किलोमीटर साठी २६५ कोटी अंदाजे रक्कम खर्च होणार आहे, परंतु काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे पावसाळा तोंडावर येत आहे तरी काम कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील भाजप_शिवसेना युतीचे आमदार खासदार बोलायला तयार नाहीत. कमिशन खाऊन सर्व मोकळे जीव सामान्य प्रवाशांचा जात आहे. आता पर्यंत आकोट अकोला रस्त्यामुळे ४०च्या वर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. रोज अपघात होतात कुणाचा हात तर कुणाचा पाय निकामी होतो शेकडो लोकांना अपंगत्व येते तरी पण या निगरगट्ट प्रशासनाला जाग येत नाही. आकोट हिवरखेड असो किंवा आकोट अकोला असो सर्व रस्ते धुळीने माखले आहेत रोज प्रवाशांचे चेहेरे धुळीने काळे होत आहेत. त्यामुळे आता अधिकाऱ्यांचे तोंड काळे केल्या शिवाय प्रहार राहणार नाही.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola