वाडेगाव(डॉ चांद शेख)– नदी खोलीकरण , रुंदीकरण तसेच नागरनी करीता वाडेगावतील व परिसरातील नागरिकांचा उत्कृष्ट प्ररितास मिळत आहे. शेतकरी, नागरिक, व्यावसायिक, पत्रकार, शिक्षक , डॉक्टर, वकील, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील तथा विविध क्षेत्रातील नागरिकांनी निर्गुणा नदी नांगरणी व खोलीकरणाला भेटी देत आहेत.
अशाच सहभाग पत्येकाने दिला तर आपला वाडेगांव परिसर पुन्हा पुर्वी सारखा हिरवळ होण्यासाठी वेळ लागणार नाही, वाडेगांव हे अशा गांव आहे की येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही कामात एकदा हात टाकल की ते पुर्ण करून च दाखवतात, याचे खुप उदाहरने आहेत जसे की स्वतंत्र्य चळवळीत सर्वात जास्त वाडेगांवातील नागरीकांनी सहभाग घेतला होता म्हणून वाडेगांवाला विदर्भाची बारडोली म्हणतात. असे खुप कामे आहेत ती लोकसहभागातून झालेली आहेत. याचीच सुरुवात ८ दिवसा पासून वाडेगांवातील सर्व जाती धर्मातील नागरीक एकत्र येऊन नदीच्या रुंदीकरण ‘ खोलीकरण, नागरनी, नदीत जागोजागी बांद टाकण्यास सुरुवात झाली आहे. दिवस रात्र काम सुरू आहे . या कामात लहाना पासून तर ज्येष्ठ नागरीका पर्यंत काम करीत आहेत.
अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात शेतकरी हिताचे ठराव, हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola