मुंडगाव(प्रतिनिधी)– मुंडगाव येथील प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी हिताचे ठराव घेण्यात आले. महाराष्ट्रा मध्ये गल्ली पासुनते मुबई पर्यन्त प्रहार वंदनीय आमदार बचुभाऊ कडु यांचा नेतृत्वात सर्व सामान्य शेतकरयांना घेवून ताकतीने लढणार आहे. सर्व शेतकरी शेतमजुरानी हात उंचावुन शेतकरी हिताचा ठरावाना अनुमोदन करून ठराव मंजुर केले ठराव पुढील प्रमाणे
१) विनाअट्ट सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
२)शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले पाहिजे
३)शेतकऱ्यांचा आर्थिक हिताचा असणारा स्वामिनाथन आयोग लागु करा.लागत मूल्य अधिक दिडपट शेतीमालाला नफा
४)शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी
५)शेतीची सर्व कामे जसे पेरणीते कापणी एम. आर.जी.एस.मध्ये (रोजगार हमियोजनेत करण्यात यावी
६)शेतकऱ्यांचा परिवारातील शेतीची वाटणी निबंधक कार्यालयात निःशुल्क करण्यात यावी
७)शेतीपिकांचे वानप्राण्यांन पासुन होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावी.
दोन्ही हात वर करून सर्ब शेतकरयांनी ठरवास अनुमोदन केले .यासर्व ठरावाची या भाजप सेना युतीचा सरकारने अमलबजावणी न केल्यास आरपारची लढाई प्रहार लढणार आहे असे मत वंदनीय बचुभाऊ कडु यांनी व्यक्त केला. तसेच या सरकारने शेतकरी विरोधी धोरण सोळले नाही तर याना यांची जागा दाखवन्यास प्रहार समर्थ आहे. जिल्ह्या परिषदेचा निवडणुकी साठी प्रहार कार्यकर्त्यानी तयार राहावे तसेच मुंडगाव सर्कल मधुन तुषार पाचकोर यांची उमेदवारी जाहीर केली. जातीचा धर्माचा नावावर नाही तर कामाच्या भरवश्यावर मतदान करायला पाहिजे. आज मी आपल्या सर्वांचा साक्षीने तुषार पुंडकर याला विधानसभे वर तर तुषार पाचकोर याला जिल्हा परिषदेवर पाठवण्याचे आव्हान करतो. या मगरूर सत्ते वर अंकुश फक्त प्रहारचा असु शकतो कोंग्रेस मध्ये लढायची हिमत पण राहली नाही.
त्या नंतर तुषार पुंडकर यांनी असे म्हटले की पुरे झाला आता जाती धर्मचा कट्टरवाद आता निर्माण करायचा आहे. शतकर्यांचा हिताचा कट्टरवाद त्यासाठी सर्व शेतकरी शेतमजुरांची जाती धर्माचे जोडे बाहेर काढुन शेतकरी ही एकच जात म्हणुन सोमोर यायला पाहिजे. महाराष्ट्राध्ये शेतकऱ्यांचा प्रशन कुठला पण असो उत्तर एकच ते म्हणजे प्रहार द्राक्ष उत्पादक शेतकरी असो ऊस उत्पादक किंवा कांदा उत्पादक शेतकरी असो आपल्या आंदोलनाचा माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न भाऊंनी सोळवले. नासिक जिल्ह्या मध्ये कांदा परिषद घेऊन चांदवड येथे आंदोलन केले व कांद्याला किंटल मागे अनुदान मिळाले. तसेच या आकोला जिल्ह्या मध्ये प्रहार शेकर्यांसाठी इमानदारीने लढत आहे. बॉंड अळीचे अनुदान असो, नाफेड मार्फत तुर खरेदी असो, जिल्हा सरकारी दवाखान्या वर आंदोलन करून दवाखाना स्वच्छ केला. 2 महिन्यान पासुन औषध पुरवठा बंद होता तो सुरू केला. रेशनकार्डा वर धान्य मिळाल पाहिजे. पीकविमा कंपनीचा प्रतिनिधींची तालुका स्तरावर नियुक्ती व्हावी यासाठी आम्ही आंदोलने केली उपोषण केले व शेतकरी हिताचा मागण्या प्रशासना कडून मंजुर करून घेतल्या आकोट मतदार संघा मध्ये विकासाची टक्केवारी कमी होवून फक्त कमिशनची टक्के वारी वाढली आहे असे मत व्यक्त केले. तुषार पाचकोर यांनी शेतकरी मेळाव्याची प्रस्तावना केली. तसेच मुंडगाव येथे आता पर्यंत केलेल्या विकास कामांचा आलेख मांडला कारेक्रमा मध्ये प्रमुख उपस्तिती मध्ये मुंडगावचे सरपंच भरत भरक्षे साहेब होते. उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील उपजिल्हा प्रमुख निखील गावंडे, तालुका कार्याध्यक्ष कुलदीप वसु, तेल्हारा नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेता विक्की भाऊ, तेल्हारा तालुका प्रमुख मुन्ना बिहाळे, शहर प्रमुख सागर उकंडे, युवक जिल्हा प्रमुख योगेश पाटील, अकोला महानगर अध्यक्ष युवक बिट्टू वाकोडे, कुलदीप भिसे, अविनाश घायसुंदर विशाल भगत, मदन मोहोकार, विपुल मोहोकार, बंटी पांडे, बचु भगत, नितीन रोठे, जीवन आखरे, चांदणे, इम्रान भाई, ज्ञानेश्वर भिसे, ओम म्हसाळ, निवृत्ती नाहाटे, दिपक नाहाटे, स्वप्नील मुयानडे, मंथन वानखडे, भुषण झापर्डे, दहीभात तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्तीत व गावकरी उपस्तीत होते.
अधिक वाचा : व्यक्ती विकासासाठी बेरोजगार मेळावा एक सुवर्णसंधी – अनिलभैय्या गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1