तेल्हारा (प्रतिनिधी):– नौकरी सोबतच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून लोकजागर मंचने बेरोजगारांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपला सर्वांचा पिंड शेती असून दिवसे दिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे व उत्पादनाला मर्यादा असल्याने उपलब्ध उत्पन्नात एका कुटुंबातील सदस्यांवर उदरभरणाचा दाब वाढला आहे. शेतीवरील हा भार कमी करण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांनी शेती बाहेर पडले पाहिजे.
युवकांनी केवळ नोकरी म्हणून याकडे न पाहता व्यक्ती विकासाच्या दृष्टीने याकडे पाहावे असे आवाहन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा,अनिल गावंडे यांनी स्थानीक भागवत मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करतांना केले. स्थापने पासूनच विविध रचनात्मक सामाजीक उपक्रमाच्या माध्यमातून अग्रेसर राहणाऱ्या लोकजागर मंचच्या वतीने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी दि, 2 जून रविवार रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिटानीया व हायर कंपनीचे प्रतिनिधींनी त्यांच्या कंपनीमध्ये रोजगार उपलबध करुन देण्यासाठी मेळाव्यात आलेल्या तरुण गरजू युवकांचे अर्ज भरून प्रत्यक्ष मुलाखत घेऊन व शैक्षणीक पात्रतेनुसार अर्जदारांना वेतन ठरवून पहिल्या पाच युवकांना मा. अनिलभैय्या गावंडे यांचे हस्ते नियुक्ती पत्र दिले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र कराळे यांनी केले तर लोकजागर मंच चे कार्य व भूमिका जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार यांनी मांडली. सदर रोजगार मेळाव्याला तालुक्यातील युवकांनी एकच गर्दी केली होती. मेळावा यशस्वी करण्यासाठी गोपाल जळमकार , तेल्हारा शहर अध्यक्ष राजेश काटे , अकोट शहर अध्यक्ष सुरज शेंडोकार ,योगेश जायले, सागर गळसकार , गजानन घुमारे , चंद्रकांत मोरे, दिपक अहेरकर , शाम अहेरकर , गजानन पाटील रावणकार, प्रविण गावंडे , सुरेश जवकार, अंकेश ताथोड, विनोद शित्रे यांचेसह कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
यावेळी 293 बेरोजगार युवकांना नियुक्तीपत्र देवून त्यांना दोन्ही कंपनीत त्यांच्या शैक्षणीक पात्रते नुसार वेतन श्रेणी ठरवून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. दोन्ही कंपनीत नोकरी सोबत पगारा व्यतिरिक्त काम करण्याचे ठिकाणी दररोज राहण्याची, नाष्टा,जेवणाची व येण्या जाण्याच्या प्रवासाची हमी ही देण्यात आली हे विशेष. याप्रसंगी उपस्थीत तरुण युवकांनी अनिल भैय्या गावंडे यांचे आभार मानले तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व नव चैतन्याचे तेज झळकत होते.
अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यात शेततळ्यात बुडालेल्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने,शेतमालकावर गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola