तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथील दोन अल्पवयीन चिमुकल्यांना शेततळ्यात जलसमाधी मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणेकडून शेततळ्यात शोधकार्य सुरू आहे.
ग्राम तालुक्यातील दोन अल्पवयीन मुले काल दुपारी ५ वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या एका शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते काल रात्री उशिरा ते घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेणे सुरू केले असता दोन्ही मुलाचे कपडे शेततळ्यालगत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली होती कपडे सापडल्याने दोन्ही मुले शेततळ्यात बुडाली असल्याची चर्चा वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली आणि बघ्याची एकच गर्दी रात्री आणि आज सकाळी शेततळ्यात जवळ जमली असून तळेगाव बाभूळगाव येथील पोहणाऱ्या इसमाकडून शोध घेणे सुरू असून अद्याप त्यांचा शोध लागला नसून पिंजर येथील आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले असून दुपारी ५ वाजेपर्यंत गाडेगाव येथे पोहचून शोधकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यावेळी ठाणेदार विकास देवरे व नायब तहसिलदार सुरळकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.