पातूर (सुनील गाडगे): राजस्थानातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 13 उंटांना पातूर पोलिसांनी शुक्रवार, ३१ मे रोजी जीवनदान दिले. दरम्यान, हे उंट घेऊन चाललेल्या दोन आरोपींनी पातूर पोलिस स्टेशनच्या आवारातून पलायन केल्याने पातूर पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय घेतला जात आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी अशाचप्रकारे पातूर पोलिसांनी तब्बल ५८ उंटांना जीवनदान दिले होते. त्यावेळीही पातूर पोलिसांनी कारवाईत चालढकल करीत उंटांची तस्करी करणाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्यावर तेथून आलेल्या दबावाच्या परिणामी पातूर पोलिसांना उंट तस्करांवर कारवाई करणे भाग पडले होते, हे उल्लेखनीय! उंटाच्या तस्करी प्रकरणात तीन राज्यातील रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्र्तविण्यात येत आहे.
राजस्थान येथून 13 उंटांना कत्तलीसाठी एका ट्रकमध्ये टाकुन हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहिती वाडेगाव पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांना मिळाली. बाळापूर येथून हा ट्रक निघताच त्यांनी आपल्या ताफ्यासह या ट्रकचा वाडेगावपासून बाभूळगावपर्यंत पाठलाग केला. पाठलागादरम्यान वैभव पाटील यांनी हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तस्करांनी हा ट्रक वैभव पाटील यांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला आणि गोंधळलेल्या अवस्थेत पोलिसांना सोडून हा ट्रक तेथून पसार झाला. सदर ट्रक आपल्या हाती न लागल्याने वैभव पाटील यांनी याची माहिती पातूर पोलिसांना दिली. पातूर पोलिसांनी हा ट्रक पकडला. एमपी ०९ -३१६७ क्रमांकाचा हा ट्रक ताब्यात घेऊन पातूर पोलिस स्टेशनच्या आवारात आणण्यात आला. दरम्यान, पातूर पोलिस स्टेशनच्या आवारातून या ट्रकमधील दोन आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तेथून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिस स्टेशनच्या आवारातून दोन आरोपी फरार होतातच कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर आरोपी पळाले की पळविले गेले? यासंदर्भातही शंका उपस्थित केली जात असल्याने पातूर पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या उंटांना राजस्थान येथून बाळापूर, पातूर मार्गे वाशिम तेथून हैदराबाद येथे नेण्यात येत होते. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी उंटाचा काफीला पातूरजवळ थांबवनू १० उंटांना जीवनदान दिले. उंटाच्या तस्करीचे रॅकेट तीन राज्यात सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते. नोव्हेंबर नंतर डिसेंबर २०१८ मध्येही अशाचप्रकारे राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वन्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जीवदान दिले होते. सदर उंटांना पातूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात आले.
राजस्थान मधुन तेलगंणा तथा आन्ध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे कत्तलीकरीता ५८ उंटाना १२ डिसेंबर रोजी नेण्यात येत होते. चार राज्यातील पोलीसांच्या हातावर तुरी देउन हे दलाल उंटाचा तस्करीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षे पासुन करीत आहेत. अनेक वेळा उंटाचे कळप हे तेलगंणा आंध्र प्रदेश राज्यात जात असताना त्यांची साधी चौकशी सुध्दा केली जात नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा गोरखधंदा सुरु असल्याने याची तस्करी करणारे प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनेज करीत असल्याचे वास्तव आहे. मात्र काही सामाजिक कार्यकत्र्यांंनी व गौरक्षण चवळवळीत काम करीत असलेल्या कार्यकत्र्यांनी या कळपावर पाळत ठेउन त्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना दिली होती. यावरुन सदरचा कळप राजस्थान वरुन हैद्राबादला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या माहितीवरुन हैदराबाद येथील पशु संरक्षण समितीचे वन्यजीव संरक्षण विशेष अधिकारी सुरेंद्र भंडारी, दिनेश अपलीया, महीप जैन यांनी पातुर पोलिसांना सोबत घेउन पकडला होता. त्यानंतर विजय बोरकर यांनी या प्रकरणाची पातुर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पातुर पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळाकाढूपणा करीत या तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वरिष्ठ स्तरावरुन दबाव आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे उंट राजस्थानमधून चोरी करून आणल्याचे तर काही उंट खरेदी करून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील भवरलाल व वक्ताराम यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सदर उंट राजस्थानमध्ये परत पाठविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आदेश दिल्यावर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा हे १० उंटांचे प्रकरण समोर आले आहे.
अधिक वाचा : बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola