अकोला(प्रतिनिधी):- तंबाखुच्या सेवनाने मुखाचा कॅन्सर तसेच धृम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर यासारखे जीवघेणे आजार होतात म्हणून संपर्कात येणा-या प्रत्येकाला तंबाखु तसेच धृम्रपान करण्यापासुन परावृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजीत राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजीत जागतिक तंबाखु नकार दिन निमीत्य मौखिक आरोग्य तपासणी शिबीरात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गोळे, तहसिलदार आशिष बिजवल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सामाजिक बांधीलकी म्हणून तुमच्या परिसरात तसेच संपर्कात येणा-या लहान मुलांना तंबाखुच्या दुष्परिणाम बाबत माहिती देवून जनजागृती करा यासाठी तंबाखु मुक्त शाळा हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात येत असल्याचे सांगुन असे सांगुन येथे आयोजीत मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील 0 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी करून त्यापैकी दुर्धर गंभीर आजारी असलेल्या बालकांवर आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया शासनाकडून करण्यात येते. नुकतेच 11 बालकांवर ह्दयरोग शस्त्रक्रिया मुंबई येथील सुराना हॉस्पीटल येथे करण्यात आली. या हॉस्पीटलतर्फे मुलांच्या मागणीप्रमाणे एका मुलाला एलईडी टिव्ही , तीन मुलांना मोबाईल, तर उर्वरीत 7 मुलांना आज नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते बालकांना सायकल वितरण करण्यात आले. अशी माहिती समन्वयक नंदकिशोर कांबळे यांनी दिली.मौखिक आरोग्य तपासणी शिबीरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची डॉ. मंगेश दातीर व डॉ. आशिष करोडे यांनी तपासणी केली.
सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी यांनी जिल्हाप्रशासनाच्या वतीने आदरांजली अर्पित केली. दिपप्रज्वलन करून मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धृम्रपान निषीध्द क्षेत्रफलक कार्यालयात लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विविध विभागांना वितरीत केले.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जागतिक तंबाखू नकार दिना निमित्य उपस्थितांना शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून डॉ. राजकुमार चव्हाण यांनी तंबाखु सेवनाने होणारे दुष्पपरिणाम व जिल्हयात 31 मे 30 जुन 2019 या कालावधी मध्ये मुख स्वास्थ तपासणी मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन तिवारी यांनी केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शस्त्रक्रिया झालेले मुले व त्यांचे पालक उपस्थित होते.
अधिक वाचा : लोकजागर मंचद्वारे २ जुन रोजी भव्य रोजगार मेळावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola