अकोला : पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, यामध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चौथा विजय मिळविलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. याशिवाय दूरसंचार मंत्रालय व ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री पदाचीही जबाबदार त्यांना देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ५८ सदस्यीय केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ७ खासदारांना स्थान मिळालं आहे. ४ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ३ राज्यमंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. यात शिवसेनेचे दक्षिण मुंबई मतदारसंघातील खासदार अरविंद सावंत आणि भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नवे चेहरे आहेत. सुरेश प्रभू, सुभाष भामरे, हंसराज अहिर या गेल्या मंत्रिमंडळातील चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल आणि अरविंद सावंत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यात पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर आणि रिपाइंचे रामदास आठवले हे राज्यसभा सदस्य आहेत.
मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पीयूष गोयल यांनी ऊर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. रामदास आठवले हे सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री होते. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्रीपद भूषविले होते.
अधिक वाचा : लोकजागर मंचद्वारे २ जुन रोजी भव्य रोजगार मेळावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola