तेल्हारा(प्रतिनिधी)– बेरोजगारांच्या हातात प्रत्यक्ष नोकरीचा आदेश देणारा भव्य रोजगार मेळावा तेल्हारा येथे आयोजित
करण्यात आला आहे. रविवार दिनांक 2 जून 2019 रोजी तेल्हारा येथील भागवत मंगल कार्यालय येथे हा मेळावा पार पडेल.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या लोकजागर मंचने हे भव्य आयोजन केले असून या मेळाव्याचे मुख्य आयोजक,लोकजागर मंचचे संस्थापक,तरुणांचे हृदयसम्राट अनिलभाऊ गावंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.ग्रामीण भागातील तरुणांची या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी गर्दी होणार आहे. निवड झालेल्या युवकांची निवास आणि भोजनाची व्यवस्था कंपनीकडून केली जाणार असल्याचे अगोदरच निश्चित करण्यात आले आहे.
तेल्हारा हा तालुका जिल्हा मुख्यालयापासून दूर असल्याने या तालुक्यावर नेहमीच सर्वच बाबतीत अन्याय होत आला आहे. विकासाची गंगा या तालुक्यापासून कोसो दूर असून विद्यमान लोकप्रतिनिधींना त्याचे सोयरसुतक नाही.काही उपऱ्याना तर या भागातील जनतेबद्दल जराही आपुलकी नाही. तेल्हारा, अकोट तालुक्यातील अनेक गावे आदिवासी बहुल असून या सर्व युवकांना या रोजगार मेळाव्याचा मोठा लाभ होणार आहे. कोणतीही क्लिष्ट प्रक्रिया न राबविता उपलब्ध कागदपत्रांच्या आणि योग्यतेच्या आधारावर हातोहात निवड आणि लगेच ऑर्डर अशी पद्धत या मेळाव्यात राबविली जाणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन अनिलभाऊ गावंडे यांनी केले आहे.
अधिक वाचा : तेल्हारा येथील एकता मंडळा कडुन रोजा ईप्तार पार्टी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola













Comments 1