अटकळी (दीपक दारोकार) – तेल्हारा तालुक्यातील 570 लोकसंख्या असलेले अटकळी हे गाव अटकळी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण अकोला सुमारे 40 कि.मी. अंतरावर अाहे. तर तालुक्याचे ठिकाण तेल्हारा सुमारे 12 कि.मी. अंतरावर अाहे.एस.टी. बस ची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत अटकळी गावात दैनंदिन दळणवळणा साठी एस.टी. बस आली नाही. अटकळी गावात यायचं म्हंटल की पाहिच यावे जावे लागते. भांबेरी वरून असो की मनब्दा वरून असो किंवा पाथर्डी वरूनही गावांमध्ये आत प्रवेश करायचे म्हटले तर पाहिच करावा लागतो.
दैनंदिन दळणवळणासाठी अटकळी गावात खाजगी वाहन ही नाही अटकळी गावाचे जीवन जणू काही पायीच झाले आहे असे दिसते. अटकळी गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे आणि पुढील शिक्षणाकरिता बाहेरगावी विद्यार्थ्यांना जावे लागते. मनब्दा, भांबेरी, पाथर्डी हे आजूबाजूच्या गावापर्यंत पाही जावे यावे लागते. अशा पायी जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुद्धा कठीण झाले आहे. पायी जावे यावे लागते म्हणून काही विद्यार्थ्यांनी तर शाळाच सोडून दिली तर काही विद्यार्थी नातेवाईकांच्या घरी पुढील शिक्षणा करिता गेले. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. आणि अशा परिस्थितीत अटकळी गावांमध्ये दवाखाना नाही, आठवडी बाजार नाही, बँक नाही, खाजगी वाहन नाही, गावांमध्ये कापड दुकान नाही, गावांमध्ये छोट्या मोठ्या वस्तु सुंध्दा मिळत नसल्यामुळे गावातील नागरिकांना बाहेर जावे लागते परंतु अटकळी एस.टी. बस का आली नाही असाही प्रश्न ? उपस्थित होतो गावामध्ये यायचे म्हटले की मनब्दा, भांबेरी, पाथर्डी या आजूबाजूच्या गावापासून येण्या जाण्या करता रोड येण्या जाण्या योग्य नसल्यामुळे एसटी बस अटकळी मध्ये येऊ शकत नाही.
असा हा अटकळी चा पाही प्रवास आहे.
अधिक वाचा : आणिबाणीच्या काळातील सत्याग्रहींना खा.संजय धोत्रे यांच्याहस्ते धनादेश वितरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola