अकोला(प्रतिनिधी) – आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला अशा व्यकतींचा सन्मान व यशोचित गौरव करण्यासाठी शासनाने दरमहा 10 हजार रूपये मानधन व त्यांच्या विधवा पत्नीस 5 हजार रूपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्या आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला अशा व्यकतींना मानधनाचे धनादेश आज दि. 29 मे 2019 रोजी खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकशाही सभागृहात वितरीत करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, संजय गांधी निराधार योजनेचे तहसिलदार आशिष बिजवल, मिसाबंदीतील सत्याग्रही ॲड. विजयराव देशमुख, पुरूषोत्तम खोत, गजाननराव नळकांडे, दिवाकर पत्की, डॉ. साहेबराव धोत्रे, नामदेवराव गावत्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना खासदार संजय धोत्रे म्हणाले की, आणीबाणीमुळे देशातील एका पिढीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भर निघणे कठीण आहे. परंतू शासनाव्दारे या काळात लोकशाही करीता लढा देणा-या सत्याग्रहींचा सन्मान म्हणून व कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून शासनाने सदर मानधन दिले आहे. आपल्या पिढीचे सतत मार्गदर्शन मिळावे असेही ते म्हणाले.
जिल्हयात आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागला अशा व्यकतींची एकुण 85 अशी संख्या आहे. आज जानेवारी 2018 पासुन ते मार्च 2019 पर्यंतच्या मानधनाचे थकबाकीसह वितरण करण्यात आले. प्रातिनीधीक स्वरूपात खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते ॲड. विजयराव देशमुख, पुरूषोत्तम खोत, गजाननराव नळकांडे, दिवाकर पत्की, डॉ. साहेबराव धोत्रे, नामदेवराव गावत्रे व स्मिता राजनकर यांना धनादेश वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकशाही सेनानी संघाचे सचिव सिध्देश्वर देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार तहसिलदार आशिष बिजवल यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नाझर मोहन साठे , निलेश दामोदर तसेच आणीबाणीच्या काळात लोकशाहीकरीता लढा देणा-या व तुरूंगवास भोगणा-या सत्याग्रहीं उपस्थित होते.
अधिक वाचा : वाडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व्यापारी संकुल व सोसायटी कार्यालयाचा जीर्णोद्धार मोठ्या थाटात संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola