चोहट्टा बाजार(प्रतिनिधी)– चोहोट्टा बाजार येथे दिनांक 5 मे पासून ते 26 मे पर्यंत गावातील विठ्ठल रुख्मिनी संस्थान
येथे श्री संत गजानन महाराज सेवा समिती व श्री गुरू गजानन गुरुदेव सेवा मंडळ यांच्या विद्यमाने शिबिराचे आयोजन ह. भ. प. पंकज महाराज पवार यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होते. शीबिरामध्ये 100 विध्यार्थी सहभागी होते. त्यांना योग, संस्कृत पाठ, श्लोक, पाऊल्या, हरिपाठ, गायन, सामुदायिक पार्थना, लाठी काठी, लेझीम, कराटे, इत्यादी विषय शिकविण्यात आले.
21 दिवसा पासून सुरू असलेल्या शिबिराचा समारोप दिनांक 26 मे रोजी मोट्या थाटात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून योग गुरू सुरेंद्र महाराज आपोतीकर (योग सिद्ध साधना अकोला, शेख गुरुजी विभागीय कार्यकारणी सदस्य गुरुदेव सेवा मंडळ, ह. भ. प. खापरकर महाराज, गावंडेसाहेब, संतोषभाऊ आढे, जुमळे ताई अकोला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकररावजी पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरवात हरिपाठ व सामुदायिक पार्थना ने झाली. त्या नंतर पाहुण्यांचे आगमन झाले, त्यांना वैशिष्ट्य शैली मध्ये परेड मार्च करून मान वंदना देण्यात आली. परेड चे प्रमुख पाहुण्यांनी निरीक्षण केले नंतर आपल्या खास शैली मध्ये प्लाटून कमांडर वृषीकेश डांगरे यांनी परेडचे नेतृत्व करित प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर गजानन महाराज यांच्या मूर्ती पूजन, दिप प्रज्वलन ,करून रीतसर कार्यक्रमाचे उदघाटन केले. स्वागत समारंभ पार पडला, त्यानंतर गोपाळ मुकुंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत 4 वर्षा पासून हे शिबीर चालू आहे. त्यातील काही नियम वैशिष्ट्ये याची माहिती दिली.
कार्यक्रमातिल सुरवातीला योग प्रात्यकक्षिक दाखविण्यात आले, लहान लहान मुलांनी शीर्षाशन, ताडासॅन, भुजंगासन सुर्यनमस्कर काढून प्रेषक मंडळीचे लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर तबला वादन, मृदंग वादन, हारामोनियंम वादान,हा देश माझा हे गीत गाउन दाखविले, संस्कृत श्लोक पठण केले, नंतर मान्यवर पाहुणे श्री शेख गुरुजी यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांप्रदायिक व गुरुदेव सेवा मंडळ याचे कार्य विशद करून समजावून सांगून संस्कार शिबीराचे भर भरून कौतुक केले. आशीर्वाद पर योग गुरू सुरेंद्रमहाराज महाराज यांनी मुलांना आशीर्वाद देऊन मुलांना ह्या कामात सात्यत्य ठेवण्यास सांगितले.
नंतर स्वसुरक्षा साठी लेझीम लाठी काठी प्रात्यक्षिक झाले मान्यवरांचे हस्ते उत्कृस्ट काम केलेले सर्व विध्यार्थी याना विजय ग्रंथ देऊन पुरस्कारीत करण्यात आले. कार्यक्रम च्या शेवटी पसायदान, व रास्तरवंदना ने समारोप झाला कार्यक्रचे सूत्र संचालन ह भप ततेश पेटे, संजय राणे गुरुजी, तर आभार प्रदर्शन विनोद बुंदे सर यांनी मानले कार्यक्रचे यशस्वी करण्यासाठी हभप उमेश महाराज वाघ, हभप विठ्ठल महाराज, सुरेश वाहिले गुरुजी,हरिओम काकडे गुरुजी, चंद्रशेखर गावंडे ,निवृत्ती राणे सर, ह भप भानुदास महाराज थोरात, श्री संत गजानन महाराज सेवा समिती,तसेच गुरू गजानन गुरुदेव सेवा मंडळ तसेच गावातील सर्व गावकरी मंडळी नि परिश्रम घेतले.
अधिक वाचा : रामेश्वर सोनटक्के यांच्या शेतात फुलली सुरन कंद शेती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola