अकोला(प्रतिनिधी) – अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रेंचा विजय झाला आहे. यासाठी शासकीय गोडाऊन खांदान, अकोला या ठिकाणी मतमोजणी झाली. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मतदारसंघामध्ये २०१४ प्रमाणेच तिरंगी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर, भाजपचे संजय धोत्रे आणि काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात होते. आता या चुरशीच्या लढतीत संजय धोत्रेंचा विजय झाला आहे, तर प्रकाश आंबेडकर आणि हिदायत पटेल यांचा पराजय झाला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते.
या ठिकाणी खासदार संजय धोत्रे हे यंदा चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसने ऐन वेळी हिदायत पटेल यांना उभे करून पुन्हा मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली होती. हिदायत पटेल हे दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावत होते. तर वंचित बहुजन आघाडी तयार करणारे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे नवव्यांदा या अकोल्यातून निवडणूक लढवत होते.2014 ची पार्श्वभूमी-2014 च्या लोकसभा मतदारसंघात 58.51 टक्के इतके मतदान झाले होते. तर भाजपचे संजय धोत्रे हे या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या निवडणुकीत हिदायत पटेल आणि प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला होता. त्या निवडणूकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
2014 ची पार्श्वभूमी-
2014 च्या लोकसभा मतदारसंघात 58.51 टक्के इतके मतदान झाले होते. तर भाजपचे संजय धोत्रे हे या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या निवडणुकीत हिदायत पटेल आणि प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला होता. त्या निवडणूकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
अधिक वाचा : मतमोजणी केंद्रावर निकाल पाहून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola