वाडेगांव(डॉ शेख चांद ) :- येथील वैभववाडीमधे गेल्या तीन दिवसापासून देशी दारु दुकानाच्या स्थानांतरण विरोधात सहा महीलांनी पुकारलेल्या उपोषण संदर्भात जिल्हाधिकारी यांनी सदर दुकानाच्या स्थलांतरणाला स्थगिती आदेश दिल्याने आज मंगळवार ( ता. २१ ) चौथ्या दिवशी सायंकाळी उपोषण सोडण्यात आले. यावेळी आमदार बळीराम सिरस्कार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांची प्रमुख उपस्थीती होती.
या संदर्भात सोमवारी ( ता. २० ) रोजी जिल्हाधिकारी यांनी मोका तपासणी साठी पाठविलेल्या पथकाने पाहणी केली असता बऱ्याच त्रुटी आढळून आल्या होत्या. तसेच वैभववाडी मधील रहिवाशांच्या तिव्र भावना, दारू विक्री रस्त्यावरून दिसणे, दुकानास कपाऊड वॉल नसणे असे चौकशीत निदर्शनास आले. सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्या दुकानाचा मालमत्ता क्रमांक२५९४ दिसून आला मात्र ग्रामपंचायतीच्या नमुना आठ रजिस्टर मधे या मालमत्ता क्रमांकावर दोन नोंदी आढळून आल्या. ग्रामपंचायतीचे बांधकामाबाबतचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच या स्थलांतरण संदर्भात शैलेष जंजाळ, राजेश ग्यानुजी डोंगरे यांनी सुद्धा तक्रारी केल्या असून अंतीम निर्णय बाकी आहे.याप्रमाणे अभिप्राय अहवाल दिला आहे. याबाबत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोट यांनी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करन्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देवून दिनांक १० मे २०१९ रोजी निर्गमित स्थलांतरणाचे आदेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले.यामुळे अखेर आज चौथ्या दिवशी उपोषण कर्त्या महीलांना आमदार बळीराम सिरस्कार, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांचे हस्ते शरबत व पेढा देवून उपोषण सोडण्यात आले. यावेळी सरपंच अन्नपूर्णा मानकर, उपसरपंच मंगेश राहुळकार, जिप. सदस्य डॉ. हिम्मत घाटोळ, ग्रा.प. सदस्य संदीप घाटोळ, सागर सरप, सदानंद भुस्कुटे, बुढढा ठेकेदारप्रकाश कंडारकर, प्रशांत मानकर, रंजीत अहीर, दिपक मसने, पो. नि. वैभव पाटील तसे च वैभववाडीतील रहिवाशी, ग्रामस्थ उपस्थीत होते.
अधिक वाचा : देवरी फाट्यावर बैलबंडीसह रास्ता रोको आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola