श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही- सी46 हा सोबत RISAT-2B हा अत्यंत महत्वाचा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. पृथ्वीवरील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या या उपग्रहामुळे भारत-पाक सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवायला मदत होणार आहे. त्यामुळे भारतात होणारी घुसखोरी नियंत्रणात आणणे शक्य होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत या उपग्रहाचा वापर मदतीसाठी केला जाणार आहे.
नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर PSLVC46 ने पृथ्वीवरील घडामोडी टिपणाऱ्या RISAT-2B या उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आले. RISAT-2B मुळे आता हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा सामना करणे अधिक सोपे होईल. इस्रोकडून कोणत्याही उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यापूर्वी तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याप्रमाणे यावेळीही इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी यावेळी पूजा केली.
#ISROMissions#PSLVC46 lifts-off from Sriharikota.
Here’s a shot of the first stage separation.
Stay tuned !!! pic.twitter.com/qJ20Zfprmr
— ISRO (@isro) May 22, 2019
RISAT-2B या उपग्रहाची वैशिष्ट्ये –
RISAT-2B मुळे अंतराळातून जमिनीवरील 3 फूट उंचावरील फोटो घेता येतील.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सीरिजमधील उपग्रहांची सुरुवात.
RISAT-2B चे वजन 615 किलोग्रॅम.
प्रक्षेपणानंतर 15 मिनिटाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हा उपग्रह सोडला.
भारत-पाक सीमेवरील हालचालींवर नजर ठेवणे शक्य.
हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक आपत्तींशी सामना करता येणार.
पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम.
अधिक वाचा : फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबील भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात : महावितरणचे आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola