आकोट (प्रतिनिधी)– अकोला या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दिड वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. रस्त्याचे काम करतांना पर्यायी मजबूत रस्ता तयार करण्यात आला नाही. त्यामुळे गत पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. तरी सुध्दा अजूनही या रस्त्याचे काम जलद गतीने करण्यात आले नाही. अशा स्थितीत पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करावे किंवा मजबूत पर्यायी मार्ग तयार करुन देण्यात यावा. अन्यथा मान्सूनच्या पर्वावर देवरी फाट्यावर बैलबंडी व इतर वाहनांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा वजा माहिती शिवसेना अकोला उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी दिली आहे.
यासंदर्भात त्यांनी रस्ते बांधकामाशी संबंधित अधिकार्यांची अकोला येथे भेट घेऊन या मार्गावर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा दिला आहे. आकोट-अकोला या मार्गाचे रुंदीकरण करण्याकरिता दुतर्फा झाडे कापण्यात आली. त्यामुळे उन्हाळ्यात या रस्त्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुसरीकडे या रस्त्याचे काम संथ गतीने करण्यात येत आहे. या रस्त्याने जात असतांना मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील चिखलात वाहने फसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पावसाळ्याच्या दिवसात आकोटातून अकोला येथे उपचाराकरिता घेऊन जाणारी रुग्णवाहिका सुध्दा अडकून पडल्याने वेळेवर उपचार भेटू शकले नाही. कित्येक अपघात झाले. अनेक वाहनांची दुरावस्था झाली असतांना सुध्दा गत वर्षभरापासून या रस्त्याचे काम झपाट्याने होत नसल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता ठिकठिकाणी खोदून काढला आहे. पुल बांधकामाकरिता लोखंडी साखळ्या उघड्यावर पडल्या आहेत. या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे अपघाला निमंत्रण देणारे ठरले आहे. या मार्गावरील शेतकर्यांना सुध्दा शेतातून माल आणण्याकरिता कसरत करावी लागत आहे. या मार्गाशिवाय अकोला येथे जाण्याकरिता इतर कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा स्थितीत पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे काम जलद गतीने करावे किंवा पर्यायी मजबूत कच्चा रस्ता तयार करुन द्यावा, जेणेकरुन पावसाळ्यात त्रास होणार नाही. अन्यथा देवरी फाट्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलीप बोचे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी रस्ते बांधकामाशी संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन या मार्गावर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा दिला आहे.
अधिक वाचा : अकोल्यात भंगारच्या गोदामाला भीषण आग, संपुर्ण साहित्य जळून खाक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola