मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. कॉमेडी, अॅक्शनपॅक, गंभीर, रोमँटिक भूमिकांमध्ये दिसणारा अक्षय त्याच्या आगामी सिनेमात चक्क तृतीयपंथीयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. राघवा लॉरेन्स दिग्दर्शीत ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे या चित्रपटाचे नाव असून याचे पहिले पोस्टर अक्षयने सोशल माध्यमातून शेअर केले आहे
हा सिनेमा ‘कंचना २’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमात अक्षयसोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात तृतीयपंथीयाच्या भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
अक्षयने शेअर केलेले पोस्टर पाहून सिनेरसिकांची अक्षयच्या भूमिकेबाबतची उत्कंठा वाढली आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरूवात झाली असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अधिक वाचा : ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटात सिद्धार्थ-मृण्मयी झळकणार एकत्र
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola