नवी दिल्ली : सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्वशक्तिनिशी लढलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अखेरचा टप्पा रविवारी पार पडताच, अनेक वाहिन्यांचे मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले. या सर्व चाचण्यांमधून भाजपप्रणित ‘एनडीए’च पुन्हा सत्तेत विराजमान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीए बहुमतासाठीचा २७२चा पल्ला पार करील, असे चित्र या सर्वच चाचण्यांमधून समोर आले असून, काँग्रेसप्रणित यूपीए केवळ १२५ ते १३० जागांपर्यंतच मजल मारील, असा अंदाजही बांधला आहे. यामुळे केंद्रात पुन्हा मोदी सरकारच स्थापन होईल, असा निष्कर्ष या चाचण्यांमधून निघत आहे.
सात टप्प्यांतील मतदानाची अखेर होताच, रविवारी सायंकाळी एकापाठोपाठ एक निवडणूक अंदाज वर्तवण्यात आले. यानुसार ‘टाइम्स नाऊ-व्हीएमआर’ने एनडीए २९६ ते ३०६ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करील, असे नमूद केले. ‘यूपीए’ची धाव मात्र केवळ १२६ ते १३२ जागांपर्यंतच मर्यादित राहील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘एबीपी-नेल्सन’ने मात्र ‘एनडीए’ला बहुमतासाठी पाच जागा तोकड्या पडतील, असा निष्कर्ष काढला आहे. मात्र ‘यूपीए’ १२७ जागांवरच अडणार असल्याचे चित्र असल्याने ‘एनडीए’साठी बहुमत विनासायास शक्य होण्याचीच चिन्हे आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात सप-बसप महागठबंधन चांगली कामगिरी करण्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला असून, पश्चिम बंगालमध्ये भाजप मुसंडी मारण्याची चिन्हे आहेत.
अधिक वाचा : पत्रकारांसाठी पातूर पोलिसांची प्रेसनोटबूक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola