अकोट(देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावात ट्रैकरने पानी पुरवठ्याची उपाययोजना करण्यात आली आहे.त्यानूसार बोर्ड़ी,शिवपुर,अमोना या तिन गावात ट्रैकरने पानी पुरवठा करण्याच्या आदेश उपविभागीय अधिकारी रामदास सिध्दभट्टी अकोट यांनी दिला आहेत.
विशेष म्हणजे अकोट तालुक्यात प्रथमच ट्रैकरने पानी पुरवठा केल्या जानार आहे. सध्या रखरखते ऊन, भूगर्भात खोलवर गेलेली पाण्याची पातळी व दुष्काळी स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची टंचाई काही गावामधे निर्माण झालि आहे. दुरवरुन पानी आणावे लागत आहे. त्यामुळे पानी टंचाई निवारणार्थ टंचाईग्रस्त गावात ट्रैकरने पानी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करनण्यात आला होता. परतू जिल्हामधे सध्यास्थितीत शासकिय ट्रैकर ऊपलब्ध नसल्यामुळे खाजगी ट्रैकर करारनाम्यातील मान्य दराने भाड्याने घेऊन ट्रैकरने पानी पुरवठा करण्या बाबतचे आदेश हैद्राबाद येथिल खाजगी ट्रैकर धारक यांना दिले आहेत. त्यामूळे बोर्ड़ी, शिवपुर, अमोना या तिन गावातील लोकसंख्या व दररोज किती लिटर पानी पुरवठा करावा आदी आदेशात नमुद केले असुन, गावातील जनावरांची संख्या सुधा या आदेशामधे नमुद करुन गटविकास अधिकारी अकोट यांचेकडे सदर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या तिन गावात आता दररोज लोकसंख्येच्या प्रमाणात फेरी करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या गावांना ट्रैकरने पानी पुरवठा व्हावा या करिता जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोन्द्रे व देवानंद पाटिल हे सतत प्रयन्तशील होते. विशेष म्हणजे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे तर जलसंवर्धन व जलसंचय करण्याच्या दृष्टीने वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून कामे सुधा करण्यात येत आहेत.तरी सुधा तालुक्यात काहि गावात ट्रैकरने पानी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.
अधिक वाचा : पाण्याअभावी सुकलेल्या केळीच्या पिकात चरण्यासाठी साेडली गुरे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola