*तेल्हाऱ्यात काढण्यात आली भव्य शोभायात्रा
तेल्हारा (प्रतिनिधी)–धर्मवीर संभाजी महाराजांच्या जन्मा पासून ते त्यांच्या बलिदाना पर्यंतचे 32 वर्षांचे संघर्षमय आयुष्य तरुणांना आदर्श देणारे आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. सचिन थाटे यांनी धर्मवीर संभाजी मंडळा मध्ये संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्य आयोजित जाहीर व्याख्याना मध्ये केले 14 मे ला संभाजी मंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करीत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा धर्मवीर संभाजी मंडळ तेल्हारा यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील 30 वर्षा पासून धर्मवीर संभाजी मंडळ शहरातील विविध सामाजीक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन तेल्हारा शहरातील समाजकारणात या मंडळाचा सिंहाचा वाटा आहे.
यावर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.13 मे 2019 ला महान पराक्रमी, शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या बलिदानाचे मोल नव्या पिढीस माहीत होण्यासाठी व धर्मवीर संभाजी महाराजांच्या कार्यास मानवंदना देण्यासाठी शिवव्याख्याते प्रा.सचिन थाटे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानातून त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या महान पराक्रमाची, बलिदानाची, शूर विर पराक्रमाची माहिती दिली. संभाजी महाराजांचे संपूर्ण 32 वर्षाचे आयुष्य हे संघर्षाचे होते. या संघर्षमय शंभू चरित्रातून आजच्या तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे. त्याच बरोबर वयाच्या 11 वर्षी संस्कृत मध्ये बुधभूशनम नावाचा ग्रंथ लिहनारे व 18 भाषामध्ये पारंगत असेलेले संभाजी महाराज हे संस्कृत पंडित व उत्कृष्ट कवी साहित्यिक होते प्रतिपादन शिवव्याख्याते सचिन थाटे यांनी केले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष परशराम घोडेस्वार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारापर्ण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मवीर संभाजी महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी केले. या वेळी प्रस्थाविक मध्ये बोलतांना त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व मागील 30 वर्षा पासून धर्मवीर संभाजी मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाला तेल्हारा शहरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धर्मवीर संभाजी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले. आभार प्रदर्शन विठ्ठल मामनकार यांनी केले तसेच 14 मे ला संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त संभाजी महाराजांच्या प्रतिमेची शहराच्या मुख्य मार्गाने ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवरायचे नारे देत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी शोभायात्रे मध्ये धर्मवीर संभाजी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.
अधिक वाचा : भांबेरी येथे पाणी फाउंडेशन तर्फे विज वितरण केंद्र भांबेरी येथील कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola