अकोट (देवानंद खिरकर): शहरात रहदारीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्यास नगर परिषदने प्रारंभ केला आहे.पहिल्या दिवशी नरसिंग रोड मार्गावरील अतिक्रमण काढण्यास सोनू चौका पासुन सुरुवात करण्यात आलि. यामधे अनेकांचे टीनशेड खोके व रस्त्यावरील अतिक्रमने काढनण्यात आली.
शहरातील रस्ते आधिच अरुंद आहेत. अश्यातच अनेक व्यवसायकानी दुकानासमोर टीनशेड व ईतर साहित्य ठेवुन अतिक्रमण केले आहे. तसेच काही लघूव्यवसायकांनि दुकानेही थाटली आहेत. त्या मूळे रस्ते वाहतुकीकरिता अडचणीचे झाले आहेत. या रस्त्यावरुन वाहने काढणेही कठिण झाले आहेत. दुकानात खरेदी करिता येणारे नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करित असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शिवाय नाल्यावर अतिक्रमणे झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात पानी तूंबनण्याचे प्रकार घडतात.
मान्सूनपुर्व साफसफाईचे करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामूळे नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. पहिल्या दिवशी सोनू चौकापासुन तर ईडीयन बँकेपरेंतची काहि अतिक्रमणे जेसीबी च्या सहायाने काढली तर लघू व्यवसायकाना वेळ दिल्याने त्यांनी आपली अतिक्रमणे स्वताहून काढली. नरसिंग मार्ग झाल्यानंतर शहरातील ईतरही गजबजलेलया मुख्यमार्गावरील अतिक्रमणे काढल्या जाणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले.
ही मोहीम नगर परिषदचे मुख्यकार्यकारी प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता विशाल वाघमारे, मनिष शर्मा, अभियंता नंदन गेडाम, आरोग्य निरीक्षक चंदन चंडालीया, नगर रचना सहायक गौरव माळवे, कार्यालय अधीषक गौरव लोदे, शीपायी संजय सावरकर, तसेच सफाई कामगार दिनेश मर्दांने, अमित बेन्डवाल, निलेश बागडे, नीरज बाबूलाल, हरिनंद शंभूकुमार, रोहित बागडे, शेख ईंमदाद, अमर चावरे, भरत मर्दांने, बालद हातेकर, किशोर तेलगोते आदी कर्मचारी यांनी केली.
अधिक वाचा : भांबेरी येथे पाणी फाउंडेशन तर्फे विज वितरण केंद्र भांबेरी येथील कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola