अकोट(देवाणंद खिरकर)– शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारया गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे (एमपीडीए विघातक कारवाया प्रतिबंधक) कायद्यानुसार अकोट येथील कुख्यात गुंड जहिरुद्दीन वय २४ याला स्थानबध्द करून थेट तरूंगाची हवा दाखविण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार व गुंडाना या कारवाईचा चांगलाच धसका बसला आहे. शहरात वारंवार नागरिकांना मारहाण करणे, खून, खंडणी, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, जाळपोळ, तोडफोड, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, अवैधरित्या गोवंशाची वाहतूक व कत्तल करणे यासारखे गुन्हे जरूद्दीन करीत होता. स्थागुशाने विविध कलमान्वये त्याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याचेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही.त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचेकडे केला होता. जिल्हाधिकारी यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून एक वष॔करीता कारागृहात स्थानबध्द ठेवण्याचा आदेश पारीत केला.