अकोला (प्रतिनिधी)-कधीच नव्हे इतकी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून ,जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जलसाठे सम्पले तर काही ठिकाणी भीषण जलसंकट ,चारासंकट उभे राहले असून ,मजुरांना कामे नाहीत. 47 डिग्री तापमानाने जिल्हा होरपळत असताना शासन प्रशासन हातावर हात ठेवून नुसती मजा पाहत असल्याचे निदर्शनास येत आहे.ताबडतोब प्रशासकीय यंत्रणा कर्यांवयीत झाली नाही तर जिल्ह्यातील दुष्काळ भयंकर रुप धारण करू शकते याची जाणीव जिल्हाध्यक्ष श्री.संग्रामभैय्या गावंडे व यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना करून देऊन त्वरित उपाय योजना राबवन्याची मागणी केली. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल असे प्रतिपादन केले.
जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडेच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय महिला कार्यकारणी सदस्य ,प्रवक्त्या डॉ.आशाताई मिरगे , माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे ,जिल्हा शहराध्यक्ष राजु मुलचंदानी , जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय वाघ , बाजार समिती अध्यक्ष राजुभाऊ मंगळे ,माजी नगरसेवक पंकज गावंडे , तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : रौदळा ते पाटसुल रस्त्यांवर चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला ६० हजारांनी लुटले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola