अकोट(देवानंद खिरकर) – तेल्हारा तालुक्यातील नेर येथिल शेतकरी घराचे बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीने अकोटकडे जात असताना त्याना रौदळा गावाजवळ अज्ञात तिन चोरट्यांनि अडविले. चाकुचा धाक दाखवुन 50 हजार रुपये व एक मोबईल अंदाजे किंमत 10 हजार असा एकुण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल घेवुन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना बुधवारी घडली. तेल्हारा तालुक्यातील नेरधामणा येथिल शेतकरी दादाराव तायडे हे सकाळी 11 वाजताच्या सुमारास अकोटकडे जात होते. नेर फाट्यावरुन ते देवरी फाट्याकडे जात असताना रौदळा गावाजवळ त्यांना अच्यानक तिनजन दिसले.या तिघांनी दादाराव तायडे यांची दुचाकी थांबविली. त्यांना मारहाण करुन चाकूचा धाक दाखवित ट्यांच्या खिशातुन रोख 1 हजार 200 रुपये, तसेच त्यांच्या जवळ असलेल्या थैलि मधिल 50 हजार रुपये,व मोबाईल असा मुद्देमाल हिसकावुन घेतला. घरांचे बांधकाम असल्याने ते सिमेंट, लोहा, गिट्टी आदी साहित्य आणण्यासाठी जात होते.चोरट्यांनि या थैलीवर नजर जाताच ते थैली हिसकावुन घेतली व पळून गेले. दादाराव तायडे यांनी चोहट्टा चौकीला धाव घेवून अपल्या सोबत घडलेली सर्व घटना पोलीसाना सान्गीतल्या प्रमाणे दाखल केली.पोलीसानि थेट घटनास्थळ गाठून चौकशी केली असता अज्ञात चोरट्याविरुध गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास दहीहंडा पोलिस ठान्याचे ठानेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अधिक वाचा : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातच सफाई कामगाराने घेतला गळफास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola