अकोला (प्रतिनिधी) – सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात तीन दिवसापूर्वी किसनराव हुंडीवाले यांचा खून केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यालय चर्चेत आले असून कार्यालयातील सफाई कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केली. मोहन संकत असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सकाळी मोहन संकत हे नियमितपणे आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते. काम करताना त्यांनी कार्यालयातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्यालयात आलेल्या कर्मचार्यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर सिव्हील लाईन पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. सर्व कर्मचारी हे कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यानंतर या कार्यालयात कोणीच आले नाही. दरम्यान, या घटनेने या कार्यालयात ही दुसरी घटना अवघ्या चार दिवसाच्या आत घडली आहे.
याआधी किसनराव हुंडीवाले यांचा खून या कार्यालयात झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे हे कार्यालय परत चर्चेत आले असून सफाई कर्मचारी संकत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संकत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अधिक वाचा : अकोल्यातील प्रॉपर्टी ब्रोकर हत्या प्रकरण; तीन आरोपी पोलिसांना शरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola