मुंबई : ‘मानवी कम्प्युटर’ म्हणून ज्ञात असलेल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार आहे. इतकेच नव्हे, तर या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
विद्या बालन हिनं स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विद्या म्हणाली, ‘ गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. एका छोट्या खेडेगावातील मुलगी ते जगभारात ‘मानवी कम्प्युटर’ म्हणून ओळखलं जाण्याचा शकुंतला देवींचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. शकुंतला देवींचा जीवनप्रवास जगाला थक्क करणारा आहे आणि मला ही भूमिका साकारायची संधी मिळतेय त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.’ असं विद्यानं लिहिलंय. विक्रम मल्होत्रांची निर्मिती असलेला हा बायोपिक २०२० मध्ये मे महिन्याच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे. अनु मेनन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.
शकुंतला देवींचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरू मध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती सर्वांना आली. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.
अधिक वाचा : ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटात सिद्धार्थ-मृण्मयी झळकणार एकत्र
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola