वाडेगाव(डॉ चांद शेख)-वाडेगावातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता येथील सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदांत हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद राहुडकार यांनी स्वखर्चाने गावामध्ये टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. ५ मे रोजी पेटकर वाडी येथे या शेतकऱ्यांच्या हस्ते टॅकरची पूजा करून उद्घाटन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात प्रजनवृष्टी होत असल्याने तसेच सर्वत्र तापमानानेही उच्चांग गाठला असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खोल जात आहे. परिणामी गावातील व शेतीभागातील जलस्तोत्राने तळ गाठल्यामुळे नागरिकांवर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गावातील गोरगरीब शेतमजुर आदी नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदात्त हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद राहुडकार यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे गावामध्ये मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे त्यामुळे गावातील नागरिकांना दिलासा मिळाला असून ते पाणीवाटपा सोबतच “पाणी आडवा पाणी जिरवा” “झाडे लावा झाडे जगवा” “चला संकल्प करूया प्रत्येकाने एक तरी झाड लावुया व ते पूर्णपणे जगवूया” असा वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आहेत. गावात त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी नारायण कौसकार, योगेश भटकर, गोपाल वाघ, संतोष नागरे, श्रीकृष्ण फाटकर, पिंटू सरप, सुधीर राहुडकर, गोपाल राहुडकर, तुकाराम पारखेडे, अतुल राहुडकर, प्रशांत महल्ले, गजानन पाटीलखेडे यांच्यासह आदी गावातील नागरीक तथा मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : वाडेगांव येथे सचेंद्र तिडके यांच्या पुढाकाराने मोफत पाणी वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola