वाडेगांव (डॉ शेख चांद) – वाडेगांव येथील सचेंद्र तिडके यांनी स्वखर्चाने १ मे पासून मोफत पाणी वाटप सुरू केले आहे. यावेळी ग्राम पंचायत कार्यलया जवळ सचेंद्र तिडके यांचा सत्कार व टॅकर चा उद्दघाटन सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर, वाय एस पठाण सर, प्रकाश कंडारकर, मंगेश राहुडकर उपसरपंच, विलाश मानकर, मनोहर सोनटक्के,प्रकाश पाटीलखेडे, सदानंद भुस्कुटे, सागर सरप, दत्ता मानकर, डॉ चांद, इत्यादी उपस्थीत होते, तसेच शिवलाल काळे सर , सुनिल घाटोळ श्री मेंडीकल, फारूक कच्ची, हनीफ कच्ची, महात्मा फुले पतसंस्था, सोफी चौक मस्जीद, इत्यादी गावातील मंडळी मोफत पाणी वाटप करीत आहे. त्याच प्रमाने अजीज खान, लोखंडे, शेख नजरू ठेकेदार यांनी ही त्यांच्या शेतातील विहीरी चे पाणी ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अधिग्रहन करुन दिल्या आहे. परंतु काही पदाधिकारी यांनी स्वतः स्वखर्चाने पाण्याचे टॅकर सुरू करतो असे ग्रामपंचायत कडे त्यांची नावे लेखी असून अजुन पर्यंत त्यांचे पाण्याचे टँकर सुरु झाले नाही असे ग्राम पंचायत कार्यलया मार्फत माहीती मिळाली आहे. त्यांचे टॅकर कधी सुरू होणार अशा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
अधिक वाचा : बेलखेड येथे महाराष्ट्र दिनी महाश्रमदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola