अकोला (प्रतिनिधी) -महावितरणचे जनमित्र व यंत्रचालक यांचा ग्राहकांशी थेट संबंध असून, सर्वच भागातील ग्राहकांना उत्कृष्ट व सातत्याने सेवा देणारे तांत्रिक कामगार हे महावितरणचा भक्कम पाया असून, स्वतःची सुरक्षिततेचीकाळजी घेऊन अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले.
महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे बुधवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्य मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील एकूण ३९ तांत्रिक कर्मचा-यां गुणवंत कामगारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. महावितरण कंपनी ही माझीच असून तिच्या भरभराटीसाठी व ग्राहक सेवेसाठी महावितरण कर्मचारयांनी दिलेल्या कामात स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले. अशा निवडक यंत्रचालक व जनमित्र यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल व सेवेबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी संघटीतपणे व सामुहिकपणे हार्ड सोबतच स्मार्ट वर्क करून ग्राहकांना तत्पर सेवा दिली पाहिजे, वीज बिल वसुली, अचूक व नियमित देयके, यंत्रणेची वेळेवर देखभाल दुरुस्ती आणि अपघातमुक्त महावितरण या बाबींना सर्वांनी प्राथमिकता देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित अधीक्षक अभियंता राहुल बोरीकर, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे व कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांनी व निवडक तांत्रिक कर्मचा-यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक शिवाजी तिकांडे यांनी व आभार प्रदर्शन उप मुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे यांनी केले.कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, प्रशांत दाणी व गजेंद्र गडेकर व प्रणाली विश्लेषक राजेश दाभने यांचेसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र उपस्थित होते.
अकोला मंडळामधून :-
१) संतोष शामराव माहोकार, प्रधान यंत्रचालक (आय.टी.आय. अकोट) ,
(२) अजयकुमार बन्सीलाल अग्रवाल, प्रधान यंत्रचालक, ३३के.व्ही.निंबी, उपकेंद्र
(३) गजानन तुळशीराम नकासकर, प्रधान यंत्रचालक ३३के.व्ही.बेलखेड.
(४) वैभव गजानन तायडे, तंत्रज्ञ,अकोला शहर उपविभाग क्र. १,
(५) श्रीकांत वैकुंठराव गव्हाणकर, तंत्रज्ञ,अकोला शहर उपविभाग क्र. २,
(६) कैलास वासुदेव बचे, प्रधान तंत्रज्ञ,अकोला शहर उपविभाग क्र. ३,
(७) अरुण शेषराव कांबळे. वरिष्ठ तंत्रज्ञ,अकोला ग्रामीण उपविभाग,
(८) श्रीकृष्ण वासुदेवराव नांदुरकर, वरिष्ठ तंत्रज्ञ,मुर्तीजापूर उपविभाग,
(९) विनोद ओंकार नेमाडे, तंत्रज्ञ, बर्शिटाकळी उपविभाग,
(१०) डिगांबर फकीरा गायकवाड, तंत्रज्ञ,पातुर शहर वि.केंद्र पातुर उपविभाग,
(११) देवचंद सुखदेव इंदोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ बाळापुर ग्रामिण -२ बाळापुर उपविभाग,
(१२) तुळशीराम श्रीराम चव्हाण,वरिष्ठ तंत्रज्ञ,उमरा वितरण केंद्र अकोट उपविभाग,
(१३) उमेश रमेश जावकर, वरिष्ठ तंत्रज्ञ,हिवरखेड वितरण केंद्र,तेल्हारा उपविभाग,
बुलडाणा मंडळामधून :-
१) पांडुरंग शेषराव गायगोळ,यंत्रचालक,३३ के.व्ही. उपकेंद्र, वरवट बकाल
(२) रामेश्वर श्रीराम दळवी, प्रधान यंत्रचालक, ३३ के.व्ही. सागवन उपकेंद्र, बुलडाणा उपविभाग
(३) गजानन महादेव जुमडे, प्रधान यंत्रचालक,३३ के.व्ही. उपकेंद्र मोताळा
(४) प्रकाश भिका वाघमारे, वरिष्ठ तंत्रज्ञ,बुलडाणा शहर -१ वितरण केंद्र
(५) विष्णु शामराव भराड, वरिष्ठ तंत्रज्ञ, चिखली शहर वितरण केंद्र
(६) प्रविण भगवान गुळवे, तंत्रज्ञ,धाड -१ वितरण केंद्र
(७) सुभाष बाळाजी शिंगणे, वरिष्ठ तंत्रज्ञ, देऊळगांवमही वितरण केंद्र
(८) आनंद किसन मराडे, वरिष्ठ तंत्रज्ञ,किनगांवराजा वितरण केंद्र
(९) विजय पुंजाजी वानखडे, मुख्य तंत्रज्ञ,मेंटनन्स विभाग बुलडाणा
(१०) प्रदीप विजयकुमार झाडोकार, तंत्रज्ञ,शेगांव ग्रामीण विभाग वितरण केंद्र
(११) गणेश शंकर चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ,सोनाळा वितरण केंद्र
(१२) प्रभाकर शंकर उगले, तंत्रज्ञ,खामगांव शहर वितरण केंद्र-३
(१३) उद्धव अशोकराव देशमुख, तंत्रज्ञ,मेहकर ग्रामिण-२ वितरण केंद्र
(१४) धिरजराव लक्ष्मण सोर, मुख्य तंत्रज्ञ,लोणार उपविभाग
(१५) योगेश रामकृष्ण काळणे, तंत्रज्ञ,कोलोरी वितरण केंद्र खामगांव ग्रामिण
(१६) मधुकर हरी इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ, नांदुरा ग्रामिण-२ वितरण केंद्र
(१७) गणेश रामराव देशमुख, वरिष्ठ तंत्रज्ञ, मलकापूर शहर-२ वितरण केंद्र
(१८) अशोक देवचंद गवई, वरिष्ठ तंत्रज्ञ, पिंपळगांव काळे वितरण केंद्र
(१९) श्रीकृष्ण बब्रुवाहन फड, वरिष्ठ तंत्रज्ञ, मोताळा ग्रामिण-२ वितरण केंद्र
वाशीम मंडळामधून :-
(१) गजानन तुळशीराम अघम, यंत्रचालक, उपकेंद्र कारंजा
(२) रत्नपाल भिमराव इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ, कारंजा शहर-२ वितरण केंद्र
(३) संदीप प्रभाकर मुंढे, तंत्रज्ञ,रिसोड ग्रामिण वितरण केंद्र
(४) सचिन हनुमानसिंग बैस, तंत्रज्ञ, शिरपुर वितरण केंद्र
(५) दिनेश शिवाचंद राठोड, वरिष्ठ तंत्रज्ञ, मंगरूळपीर ग्रामिण-२ वितरण केंद्र
(६) सोनाली शंकरराव मंडाले, तंत्रज्ञ, वाशिम ग्रामिण पूर्व वितरण केंद्र
(७) मो. राजीक अब्दुल सलाम शेख, तंत्रज्ञ,मानोरा ग्रामिण-१ वितरण केंद्र
या सर्वांचा समावेश होता.
अधिक वाचा : अकोला विभागातील महावितरणच्या उत्कृष्ठ काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचा होणार गुणगौरव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola