अकोला(प्रतिनिधी)- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या खामगाव या तिन्ही जिल्ह्यात विधी विषयक अभ्यासक्रमाकरीता सुरू असलेल्या परीक्षांमध्ये पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाकरीता 10 व्या सेमिस्टरचा पहिला पेपर सोमवारी झाला. विद्यापीठाअंतर्गत 80/20 चे पॅटर्न असताना विद्यार्थांना जुन्या अभ्यासक्रमाचा 100 मार्कांचा पेपर देण्यात आला. चुकीची प्रश्नपत्रीका मिळल्याची चुक विद्यार्थांनी पर्यावेक्षकांच्या लक्षात आनून दिल्या वर सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगुन विद्यार्थांची दिशाभूल करण्याचं काम सोमवारी अकोला शहरातील दापकी रोड स्थित भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालयात घडली. परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी नविन अभ्यासक्रमाचे असुन त्यांचा पेपर 80 गुणांसाठी होता. परंतु विद्यार्थांच्या हाती जुन्या अभ्यासक्रमाचा 100 गुणांचा पेपर देण्यात आला. सदर प्रकार अकोला प्रमाणे खामगाव अमरावती येथे सुद्धा घडला परंतु खामगाव अमरावती येथील परीक्षाकेंद्रावर विद्यार्थांनी चुक पर्यावेक्षकांच्या लक्षात आनून दिल्या नंतर त्यांना 30 मिनिटात नविन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रीका उपलब्ध करून दिल्या व 30 मिनीट वेळ वाढवुन देण्यात आला.
सदर भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालय येथे परीक्षेसाठी येनार्या विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. विद्यार्थांनी विद्यापीठाकडे रितसर परीक्षा शुल्काची भरना देल्यावर सुद्धा याठीकानी विद्यार्थांना आपल्या ठेवण्यासाठी पैशाची मागणी होत असतांना दिसत आहे. उन्हाळाचे दिवस पाहता या महाविद्यालयात विद्यार्थाना घानेरड्या बाटलीतून दुषित गरम पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे विद्यार्थांनी महाविद्यालयावर ताशेरे ओढले आहेत.
“ संपुर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक विद्यापीठे विधी विषयाबद्दल गंभीर नसुन ते विधी शाखेच्या अभ्यासक्रमांची विटंबना करीत आहेत. भावी वकीलांसोबत अश्या घटना घडवुन आनने याबद्दल मी प्रशासनाचा जाहिर निषेध करतो. यासंदर्भात महाविद्यालयामध्ये या घटनेची विचारना करण्यासाठी पर्यावेक्षांकडे गेलो असता. त्यांनी मला महाविद्यालयातुन हाकलुन लावले मी जाब विचारायला आलोय असे म्हटल्यावर त्यांनी मला पोलिसांना बोलवा याला अटक करायला लावा अशी धमकी दिली.या संदर्भात सदर पर्यावेक्षकांना निलंबित करून. विद्यार्थांचे नुकसान होवु नये म्हणुन पुन्हा परीक्षा घ्यावी व सर्व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत सविस्तर बैठक 3 मे रोजी होणार आहे. कुलगुरू यांना भेटून निवेदन देवुन सविस्तर माहिती देवु तोडगा न निघाल्यास विद्यापीठाला ताला ठोकून त्रिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला) तर्फे देण्यात आला.
अधिक वाचा : हिंगणी बु येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गिरवले पोलीस ठाण्याच्या कारभाराचे धडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola