तेल्हारा(विशाल नांदोकार)- जि.प.व.प्राथ.शाळा हिंगणी बु येथील विद्यार्थ्यांनी घेतले पोलिसांच्या कार्यपद्धतीचे धडे दि. २५ एप्रिल रोजी पोलीस स्टेशनच्या कामकाजा विषयी माहिती मिळावी या उदात्त हेतुने हिंगणी बु येथील जि प शाळेने भूगोल विषया अंतर्गत विद्यार्थांच्या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना बालवयात सार्वजनिक ठिकाणाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी क्षेत्र भेट अंतर्गत हिंगणी बु येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन ला भेट दिली. कार्य कशा प्रकारे चालते, त्यांची कार्यपद्धती ठाण्याचा कारभार समजावा या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी पोलिसांच्या कार्यपद्धतीची तसेच समाजात शांतता राहावी,याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी ठाणेदार एस.डी.पवार साहेब यांनी बिनतारी संदेश, गुन्हेगारांचे बंदीगृह,गुन्हेगारांच्या वाईट कृत्याची माहिती देऊन, आपसात वाद न घालता भविष्यात सलोखा निर्माण करण्यासाठी शांतता व आपुलकी निर्माण करावी, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पवार साहेबांना मनसोक्त प्रश्न विचारले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री भुजबले सर,कोरडे सर, निंबाळकर मॅडम, वाकोडे सर, ढोकणे सर, भड सर, पोके सर व विठ्ठल भाऊ जोध आदी हजर होते.
अधिक वाचा : दहीहंडा पोलीस ठाण्याचे दोन लाचखोर पोलिस लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola