अकोला : वारंवार अपमानास्पद वागणूक मिळते, कोणत्याच बैठका, पत्रकार परिषदा, चौक सभा यांना निमंत्रण दिले जात नाही, वचननामा, प्रसिद्धीपत्रक यावर कुठेही रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हाप्रमुख रामभाऊ तायडे यांचा फोटो लावला जात नाही, भाषणात ‘जय भीम’ म्हटले जात नाही, स्टेजवर मागे बसवून अपमान केला जातो. अशी कारणे देत आरपीआयच्या (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी महायुतीशी फारकत घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा विरोध करीत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देत असल्याचे गुरुवारी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.
शिवसेनेने वचनामा प्रसिद्धीसाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांना तसेच नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथील जिल्हा अध्यक्षांना जाणीवपूर्वक मागे बसवून अपमान केला गेला. याबद्दल संतप्त कार्यकर्त्यांची समजूतही काढली नाही. अशी मानहानी आम्ही कायम सहन करायची का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि जिल्हाध्यक्षांशी आमचे बोलणे झाले. मात्र, त्यांनी आम्हाला अशी भूमिका घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे कारवाई झाली तरी तिला सामोरे जाऊ, पण राजन विचारे यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, विकास चव्हाण, रिपाइं कामगार अध्यक्ष विशाल ढेंगळे, रिपाइं माथाडी अध्यक्ष विनोद भालेराव, अशोक कांबळे, रमेश पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोला जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola