हिवरखेड (दीपक रेळे) – सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या मतदाना दरम्यान मतदान केंद्र क्रमांक 66 महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड येथे दुपारी एक ते दोन च्या दरम्यान आरोपी शेख शाहरुख शेख अनिस वय 22 राहणार इस्लामपूरा हिवरखेड हा मतदाना करीता आला होता. यावेळी तेथे मतदान केंद्राध्यक्ष एकनाथ रंगराव वैद्य, प्रशांत माणिकराव बागडे, देविदास रामदास मानखैर, किर्तिकुमार हरिप्रसाद जैस्वाल हे मतदान अधिकारी आणि सुरक्षा गार्ड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भिवाजी सिडाम, इत्यादी हजर होते.
त्यावेळी आरोपी शेख शाहरुख शेख अनिसकडे मोबाईल सुरू होता. व तो संपूर्ण मतदान केंद्र आणि परीसराचे चित्रीकरण करीत होता. तेव्हा मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी त्याला मोबाईल बंद करण्यास सांगितला. तरीसुद्धा वारंवार सूचना देऊनही आरोपीने मतदान अधिकाऱ्यांचे सूचनांचे पालन न करता हेतुपुरस्सर जाणून-बुजून नियमांचे उल्लंघन करीत मतदान कक्षात मतदान करताना मोबाईल द्वारे छायाचित्रण केले. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे असलेले दोन्ही मोबाईल घेऊन घेतले. आणि दोन्ही मोबाईल पोलिसांना सादर करीत ,नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या युवका विरुद्ध कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार मतदान केंद्राध्यक्ष एकनाथ रंगराव वैद्य यांनी हिवरखेड पोलिसात दिली. सदरच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी शेख शाहरुख शेख अनिस वर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नंदू सुलताने करीत आहेत.
अधिक वाचा : अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५९.७६%
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola