तेल्हारा(प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा या गावची माहेरवाशीण सिमा चिमनकार या रोज अकोला ते तेल्हारा हा ६० किलोमीटरचा प्रवास करून श्रमदानासाठी हजर होतात. अकोल्याच्या श्री शंकरराव खंडेलवाल महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या सिमाताईंनी २ महिने सुट्टी टाकली आहे. दररोज श्रमदानासाठी जाता यावं म्हणून त्यांनी एसटीचा पासही काढला आहे.
अपघातात जोडीदार गमावल्यानंतर लहान मुलगा ऋषी याच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावतानाच आता त्या जन्मगावासाठीही एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. मुलाचं यंदा १० वीचं वर्ष असल्याने त्यांना जलसंधारणाचं प्रशिक्षण घेता आलं नाही आणि ४५ दिवस गावात राहणं पण शक्य नव्हतं. पण ज्या मातीत जन्म झाला त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी सिमाताईंनी त्यावर उपाय शोधला. रोज ६० किलोमीटर एसटीने येणं जाणं करून त्या श्रमदानही करत आहेत आणि मुलगा ऋषीचीही काळजी घेत आहेत. तेल्हारा तालुक्यातलं मनब्दा गावच्या मातीला एका आईचा मायेचा स्पर्श होतोय. पावसाचा ओलावाही त्याला लाभेल ही आशा.
अधिक वाचा : मोदी जिंकल्यास तुम्ही गुलाम : राज ठाकरे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola