• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मोदी जिंकल्यास तुम्ही गुलाम : राज ठाकरे

adil by adil
May 14, 2020
in अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
80 1
0
raj-thackeray
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : ‘गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देश डबघाईला आला आहे. त्यातच पुन्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेवर आले तर ते देशाला गुलाम बनवतील. त्यामुळेच देशात लोकशाही हवी की हुकूमशाही हवी हे ठरवणारी ही निवडणूक आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा पुन्हा या देशाच्या राजकीय क्षितिजावर दिसणार नाहीत, हे लक्षात ठेवून सारासार विचार करून मतदान करा,’असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यातील सभेद्वारे मतदारांना केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची एकमेव सभा गुरुवारी सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत झाली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. या सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. ‘नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देश डबघाईला गेल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. पुन्हा ते सत्तेवर आले तर देश आणखी रसातळाला जाईल. पाच वर्षांत त्यांनी जे रंग दाखवले ते पाहता पुढील पाच वर्षांत ते काय करू शकतील, याची कल्पना केलेलीच बरी. त्यामुळे त्यांच्या हाती पुन्हा सत्ता द्यायची का, याचा विचार करा. त्यांना आणि त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांनाही सत्तेपासून दूर ठेवा. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. अनेक स्वप्न दाखवली होती. त्यातले एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही. त्याबद्दल चकार शब्दही न काढता मोदी आता शहीद जवानांच्या आधारावर, जातीच्या आधारावर मते मागत आहेत,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जवान, शेतकरी किंवा अन्य कोणाच्याही बाबतीत मोदी यांना आस्था नाही, प्रेमही नाही. जवानांपेक्षा व्यापारी अधिक साहसी असतो, असे मोदी म्हणतात. त्यातूनच त्यांची मानसिकता कळते. मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्याबद्दल देशाला अनेक प्रश्न पडले आहेत. त्यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मोदी यांना द्यायचे नाही. गेल्या पाच वर्षांत देशात अमित शहा यांच्या मुलाची संपत्ती सोडून काहीही सुधारणा झाली नाही. पाच वर्षांत कुठल्याच बाबतीत सुधारणा झाली नाही. मग पुन्हा मोदी यांच्या हातात सत्ता देणार का,’ असा सवालही राज यांनी केला.

अधिक वाचा : ‘हे’ कलाकार मतदान करू शकत नाहीत

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaMNSraj thakre
Previous Post

राग सहन न झाल्याने मुलानेच केली बापाची हत्या

Next Post

श्रमदानासाठी ती करते दरोरोज ६० किमी चा प्रवास

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
श्रमदानासाठी ती करते दरोरोज ६० किमी चा प्रवास

श्रमदानासाठी ती करते दरोरोज ६० किमी चा प्रवास

जाणीवपूर्वक मतदान केंद्राचे चित्रीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल

जाणीवपूर्वक मतदान केंद्राचे चित्रीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.