अकोला(प्रतिनिधी)– अकोला लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक मतदान प्रकिया पार पडली यावेळी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.अकोला लोकसभा मतदारसंघात मतदार संख्या एकूण १८ लाख ६१ हजार ११४ एवढी असून त्यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ६३ हजार ५६३ व महिला मतदार ८ लाख ९७ हजार ५०३ अशी आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी २०८५ एवढी मतदान केंद्रे जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी सज्ज केली होती. अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, रिसोड अशी विधानसभा मतदारसंघ येत असून आज मतदारांनी आपला हक्क बजावून एकूण टक्केवारी ५९.७६ % झाली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच दिव्यांगणासाठी व्हील चेअर तसेच वाहनांची सोय करण्यात आली होती. यावेळी मतदारांमध्ये मतदान करता वेळी उत्साह दिसून आला. उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीन मध्ये सीलबंद केले असून मतदानाची जुळवाजुळव उमेदवाराकडून सुरु आहे.या माध्यमातून कोण निवडून येईल याचे तर्कवितर्क लावन्यात येत आहेत.
अधिक वाचा : मतदान करताना फेसबुक लाईव्ह, चौघांविरोधात गुन्हा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola