वाडेगाव (डॉ शेख चांद) : बाळपुर तालुक्यातील वाडेगाव येथे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते यूसुफ पठान हे १५ एप्रिल पसुन ग्रामसचिवलय समोर आमरण उपोषणास सुरवात करण्यात आली होती.यावेळी उपोषणाला पूर्ण गावातुन हजारो महिला,पुरुष यानी उपस्थित राहून वाय एस पठान याना पाठीबा देण्यात दिला होता.
या दोन दिवशीय उपोषणाला पूर्ण गावतुन बहुसंख्य ग्रामस्थ हजर झाले होते. हे वातावरण पाहून ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी उपोषण कर्त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या सहकारी ग्रामस्थानां तुमचे लेखी अस्वासन व नियमित पाणी पुरवठा करत असल्यास उपोषण मागे घेण्यात येईल असे वाय एस पठाण यांनी सांगितले होते..यावेळी पठाण यांनी एक समिती गठीत करून त्यांनी बनविलेले नियम ग्रामपंचायत प्रशासनाला मान्य करून घेऊन त्यांच्याकडून लेखी आश्वासन पत्र घेतले व त्या ठरलेल्या नियमामुळे जर पाणी सुविधा दिली नाही तर पूर्ण ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहो असे उपोषण कर्ता व ग्रामस्थानी तोंडी सांगितले आहे..या समितीमध्ये प्रमुख म्हणून रेवस्कर सर, श्याम अवचार, , प्रकाश पाटीलखेडे, मो अफतार, डॉ. शेख चांद ठेकेदार, अरुण हुसे, मधुकर निबोकार, विजय ठाकरे, प्रमोद मसने, प्रकाश कंडरकर, मनोहर सोनटक्के, शेख इब्राहिम, शेख सलीम जमदार, पप्पू संगोकर, जावेद भाई केशव सरपं, गणेश किसन मोकळकर आदी नि विचार करून या पाणी समस्येसवर तोडगा काढण्यात आला..या गावामध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या टाकीमध्ये सर्व टँकरमध्ये पाणी पुरवठा केल्या जाईल,२) प्रशासनाकडून गावामध्ये दर दिवसाला ६ वार्डात ६ टँकरमध्ये पाणी पुरवठा केल्या जाईल, महत्वाच्या पाईप लाईनवरील स्टॅण्डपोच बंद करण्यात येईल.प्रत्येक टँकर एका वार्डात दरदिवसाला ३ वेळा ठरवून दिलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा करतील ..या अटी मान्य केल्या असून, गावतील होतकरू तसेच समाजबांधवांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून टँकर किंवा शेतातील पाणी देण्याचे मान्य केले आहे..या जलसेवा करणाऱ्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य डॉ हिमत्तराव घाटोळ, सामाजिक कार्यकर्ते दिपक मसने, मोहम्मद अफतर मोहम्मद युसूफ,शेख सलीम शेख राहुल्ल यां ग्रामस्थानां पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हे उपोषण सोडविण्याकरिता प्रा यु के काळे सर, सरपंच अन्नपूर्णा जगन्नाथ मानकर, उपसरपंच मंगेश राहुडकार, ग्रामपंचायत सदस्य संदिप घाटोळ, सदानंद भुस्कुटे, राजू अवचार, डॉ हिम्मतराव घाटोळ, प्रशांत मानकर , अय्याज साहिल , दत्ता मानकर, महादेव लोखंडे,शामलाल लोध शिवलाल घाटोळ,मंगेश जंजाळ, सागर सरप, तसेच गावतील प्रतिष्टीत नागरिक महिला, पुरुष हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : धरण तलावातील मृत जलसाठ्याचे नियोजन करून त्याचा पिण्यासाठी उपयोग करावा- मुख्य सचिव यु.पी.एस.मदान