अकोला (प्रतिनिधी) – 18 एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होत असून या निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीला मजबूत करावे प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ” हम युवा मतदार है ” या चित्रफितीचा अनावरण सोहळा मा. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह अनेकांच्या उपस्थित झाला.
ही चित्रफीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे संकल्पनेत आणि उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे मार्गदर्शनात तयार करण्यात आली आहे. दिग्दर्शन आणि चित्रिकरण चंद्रकांत पाटील टी.व्ही. कॅमेरामन यांनी केले असून गीत आणि संगीताची संकल्पना संतोष भाकरे पाटील यांची असून गायक आनंद जागीरदार यांनी स्वरसाज चढविला आहे. संकलन विशाल टाले पाटील यांनी केले आहे. ध्वनी जय गुरु यांचे असून आशिष तोमर यांची ऐरियल शुट केले आहे.
या चित्रफीतेसाठी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी नितीन डोंगरे, स्विपचे नोडल अधिकारी प्रकाश अंधारे आणि संतोष अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. लोकसभा मतदार संघातील युवक युवती महिला पुरुष दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा एकूणच सहभाग असलेली ही चित्रफीत नक्कीच मतदानाच्या जनजागृतीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. चित्रफीतीचे अनावरण प्रसंगी उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, प्रमोद देशमुख, नायब तहसिलदार सतीष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिक वाचा : ही निवडणूक नसुन ही विकासाची अन राष्ट्रीय अस्मितेची लढाई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola