विशाल नांदोकार (तेल्हारा) : भारतात दिवसेंदिवस टिक टॉकची युवाकांसह वृद्ध नागरिकांमध्ये सुद्धा आवळ वाढत जात आहे. टिक टॉक अॅपचा गैरवापर होत असून टिक टॉक अॅपमध्ये अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत आहेत तसेच आपले भारतीय लष्कराचे जवान सुद्धा या अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याने भारतीय लष्कराची गुप्त असलेली माहिती, स्थान नकळत या अॅपच्या माध्यमातून उघड हॉट असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी आनंयत यावे.
टिक टॉक अॅप हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही. या अॅपचा वापर अश्लील व्हिडिओ, मजकूर अपलोड करण्यासाठी केला जात आहे. टिक टॉक अॅपवर पोर्न व्हिडिओ अपलोड करण्यात येत आहेत. हा अॅप बनवणारी कंपनी ByteDance लाही हा अश्लील मजकूर हटवण्यात अपयश आले आहे, असे समोर येत असून भारतीय संस्कृतीला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. टिक टॉक अॅप हा तरुणाईचा आवडता अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून शॉर्ट व्हिडिओ तयार करून तो शेअर करता येवू शकतो. भारतात २०१८ मध्ये सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत टिक टॉकचा समावेश होता. टिक टॉक अॅपवरून केलेला व्हिडिओ लोक व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरही शेअर करतात. केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात या अॅपला तरुण वर्गात खूप मागणी आहे. योग्य वापर झाला तर काही समस्या नाही मात्र या अॅप्सच दुरुपयोग हॉट असल्याने हे अॅप्स बंद करनेच योग्य राहिल.
अधिक वाचा : लोकप्रिय टिक टॉक वर हायकोर्टाची बंदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola