तेल्हारा (प्रतिनिधी) : गावोगावी तथा विविध शाळा महाविद्यालयात थोर पुरूष महामानव यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान करणे व त्यासाठी कुठलीही रक्कम न घेता त्यापोटी त्याच गावातील गोरगरीब, गरजू, होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे प्रेरणादायी काम तेल्हारा येथील युवा व्याख्याता करित आहे.
तेल्हारा येथील शिवव्याख्याते सचिन थाटे डाॅ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी याच महाविद्यालयात विविध उपक्रम करून काॅलेज मध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर विविध कार्यक्रमात सहभाग घेवून वाद विवाद स्पर्धा, भाषणाच्या माध्यमातून तयारी करून महाविद्यालय स्पर्धेत पुरस्कार मिळवले. त्यामुळे आज थोर पुरूष महामानव यांच्या जीवनावर व्याख्यान करून परिसरात शिवव्याख्याते म्हणून ख्याती केली व मिळेल त्या व्यासपीठावर शिवरायांचे विचार घराघरात, मनामनात पोहचविण्यासाठी व्याख्यान , प्रबोधन करून शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचले पाहिजे हा संकल्प करून शिवाजी महाराजांचे विचार व्याख्यानाचे माध्यमातून पोहचवण्याचे काम ते करित आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बाळासाहेब ठाकरे वकृत्व स्पर्धेत विदर्भाचे नेतृत्व करून व्याख्यान केले होते, तेथेही शिव विचार प्रखरतेने मांडले. शिवाजी महाराजांचे विचारांना जाती, धर्म,पंथ यात न गुरफटता यांच्या पलीकडे नेऊन शिवाजी महाराजांचे विचार व्यापक स्वरूपात घरा घरांत पोहचले पाहिजे हा त्यांचा प्रयत्न असल्याने त्या कार्याला सामाजिक जोड म्हणून व्याख्यान करून कुठलेही मानधन न घेता त्यापोटी त्याच गावातील गोरगरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे उपक्रम सचिन थाटे करित आहेत. या त्यांच्या उदात्त कार्याची सर्वत्र वाहवाह होत आहे.
अधिक वाचा : ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेल्हारा नगराध्यक्षांना नागरिकांचा घेराव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola